भारत सरकारच्या गृहनिर्माण आणि शहरी दारिद्रय निर्मूलन मंत्रालयाने जारी केलेल्या राष्ट्रीय शहरी रोजगार अभियान (NULM) आणि दीनदयाळ अंत्योदय योजनेंतर्गत बेळगाव महानगरपालिकेने रस्त्यावरील विक्रेत्यांना DAY-NULM अंतर्गत स्मार्ट कार्ड आणि जिओ टॅगिंग देण्याचे अभियान आखले आहे.
शहरी दारिद्रयाचे प्रमाण कमी करणे, शहरी गरीब कुटुंबातील व्यक्तींना कौशल्य विकास प्रशिक्षण देऊन रोजगाराची किंवा स्वयंरोजगाराची संधी उपलब्ध करुन त्यांच्यां राहणीमानाचा दर्जा उंचावणे, नागरी बेघरांना मुलभुत सेवा उपलब्ध असलेल्या निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करणे,
नागरी भागातील फेरीवाल्यांच्या उपजिविका संबंधी समस्या सोडविण्याच्या दृष्टीने आवश्यक ती उपाययोजना करणे अशी उद्दिष्ट्ये असलेल्या या अभियानांतर्गत बेळगाव मनपा हद्दीतील फेरीवाल्यांसाठी GPS सर्व्हेक्षण आणि QR कोडसह स्मार्ट ओळखपत्र आणि व्हेंडिंग
प्रमाणपत्र तसेच जिओ टॅगिंगसह रस्त्यावरील विक्रेत्यांचे सर्वेक्षण करण्यासाठी निविदा काढल्या आहेत. बेळगाव शहर महानगरपालिका हद्दीतील १०२६३ रस्त्यावरील व्यावसायिकांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
डेटा एंट्री, छायाचित्रांचे स्कॅनिंग, प्रत्येक विक्रेत्याची माहिती, PVC आयडी कार्ड असलेले 8.5 x 5.5 सेमी आकाराचे वॉटर प्रूफ स्मार्ट कार्ड, सरकारी लोगो, विक्रेत्याचा तपशील, युनिक आयडी, होलोग्राम आणि वॉर्ड कोड तसेच स्वतंत्र क्युअर कोड, जिओ टॅगिंग असे या स्मार्टकार्डचे स्वरूप आहे.