Thursday, January 9, 2025

/

सुनक यांचे कौतुक करणाऱ्या हिंदूत्ववाद्यांनी सोनियांची अवहेलना केली.

 belgaum

बेळगाव येथील प्रगतीशील लेखक संघातर्फे ‘ब्रिटनमधील राजकीय उलथापालथ’ या विषयावर बोलताना जागतिक घडामोडींचे अभ्यासक काॅ अनिल आजगांवकर यांनी आर्थिक अंगाने ब्रिटनमधील सद्य परिस्थितीचे विस्तृत विश्लेषण केले. शहीद भगतसिंग सभागृहात या व्याख्यानाचे आयोजन केले होते.यावेळी व्यासपीठावर प्रा. आनंद मेणसे, काॅ. कृष्णा शहापूरकर आणि अॅड. नागेश सातेरी उपस्थित होते.

आजगांवकर आपल्या भाषणात म्हणाले ब्रिटनवरील आजच्या आर्थिक संकटाची बीजे खरे तर ब्रेकझिट सार्वमत काळातच रोवली गेली. युरोपियन युनियनशी फारकत घेतल्याचा निर्णय घेतल्यानंतर सकल राष्ट्रीय उत्पन्न दर कमी होणे, युनियनच्या सदस्य देशांनी उद्योग हालविणे, बेरोजगारी, दैनंदिन वस्तूंची महागाई, कृषी उत्पादनांना नवी बाजारपेठ शोधावी लागणे असे त्यांचे स्वरूप होते. ब्रेकझिट करार करण्यासही अनंत अडचणी आल्या. मतभेद झाले. त्यातून राजकीय यंत्रणा खिळखिळी झाली. परिणामी सहा वर्षात पाच पंतप्रधान बदलावे लागले.Anil ajgankhar

याशिवाय करोना साथीत सरकारी खर्चाचे निट नियोजन न होणे, युक्रेन युद्धात नाटो सदस्य म्हणून मदत, दुसरीकडे रशियावर निर्बंध लादल्याने उर्जा आणि इंधन महागाई, अनियंत्रित स्थलांतरे आणि या साऱ्या संकटांवर परिणामकारक उपाय न करू शकणारे ब्रिटिश नेतृत्व यामुळे ब्रिटन संकटात सापडला आहे.

आता ब्रिटिश अर्थव्यवस्थेची वादळात सापडलेली नौका सांभाळण्यासाठी ॠषी सुनक यांची पंतप्रधानपदी निवड झाली आहे असे म्हणत त्यांच्यासमोर असलेल्या आव्हानांचे विवेचन आजगांवकरानी केले. सुनक भारतीय वंशाचे आहेत ही अभिमानाची गोष्ट आहे.

परंतू याबाबतीत भाजप व हिंदूत्ववाद्यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधींची जी अवहेलना केली ती विसरता येणार नाही. आज हीच मंडळी सुनक यांचा जयघोष करीत आहेत त्यानी ब्रिटिश उदारमतवादातून बरेच कांही शिकण्याची गरज आहे. असे प्रतिपादन त्यांनी केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. आनंद मेणसे यांनी केले तर कृष्णा शहापूरकर यांनी आभार मानले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.