श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर बेळगाव आणि इन्फिनिटी फिल्म प्रोडक्शन यांच्यातर्फे येत्या दि. 19 ते 23 नोव्हेंबर 2022 या कालावधीत खुल्या दररोज सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत ‘स्वर सप्त सुरांचे… नाद भजनाचे’ ही भव्य भजन गायन स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेचा प्रकाशन सोहळा नुकताच उत्साहात पार पडला.
भजन गायन स्पर्धेच्या निमंत्रण पत्रिकेचा प्रकाशन सोहळा श्री क्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिर विश्वस्त व व्यवस्थापन समितीचे सदस्य राजू भातकांडे, माजी नगरसेवक सुनील बाळेकुंद्री, अभिजीत चव्हाण, राकेश कलघटगी, अनुप पवार,विवेक पाटील आदींच्या हस्ते पार पडला. यावेळी पुढील प्रमाणे स्पर्धेबाबतची माहिती देण्यात आली.
श्री कपिलेश्वर मंदिर विसर्जन तलाव या ठिकाणी सलग चार दिवस होणाऱ्या ‘स्वर सप्त सुरांचे… नाद भजनाचे’ या भव्य भजन गायन स्पर्धेसाठी एकूण 15 प्रमुख बक्षिसे पुरस्कृत करण्यात आली आहेत. यापैकी प्रथम पाच बक्षिसे 25 हजार रु., 20 हजार रु., 15 हजार रु., 10 हजार रु., 5 हजार रुपये व आकर्षक मानचिन्ह अशी असणार आहेत. याव्यतिरिक्त प्रत्येकी 2 हजार रुपयांची पाच उत्तेजनार्थ बक्षीस आहेत. त्याचप्रमाणे उत्कृष्ट गायक, उत्कृष्ट टाळ वादक, उत्कृष्ट तबला वादक आणि उत्कृष्ट भजनी मंडळ अशी प्रत्येकी 2 हजार रुपयांची पाच वैयक्तिक बक्षीस हे पुरस्कृत करण्यात आली आहेत.
स्पर्धेतील भजन गायनासाठी 20 मिनिटांची वेळ दिली जाईल. त्यापैकी तयारीसाठी 5 मिनिटे आणि गाण्यासाठी 15 मिनिटे असतील. स्पर्धेच्या शेवटच्या दिवशी म्हणजे 23 नोव्हेंबर रोजी बक्षीस वितरण समारंभ होईल.सदर कार्यक्रम नवीन कपिलतिर्थ तलावावर होणार आहे. मंचावर स्पर्धा असून महाराष्ट्रातून पंच येणार असून रियालिटी शो च्या धर्तीवर ही स्पर्धा भरणार आहे.
यावेळी आयोजित ‘दीपोत्सव गजर टाळ मृदंगाचा’ हा कार्यक्रम मुख्य आकर्षण असणार आहे तरी उपरोक्त स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी अधिक माहिती व नाव नोंदणीसाठी सुनील बाळेकुंद्री (9902539767), राजू भातकांडे (9242714507), अनुप पवार (8884832733) अथवा अभिजीत चव्हाण (9844592416) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.