स्टार एअरलाइन्स आपली बेळगाव -नाशिक विमानसेवा येत्या जानेवारी 2023 पासून पुनश्च सुरू करत असल्याची माहिती देणारे पत्र केंद्रीय नागरी हवाई उड्डाण खात्याचे मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी येवोल्याचे (महाराष्ट्र) विधानसभा सदस्य छगन भुजबळ यांना पाठविले आहे.
केंद्रीय मंत्र्यांनी आपल्या पत्रात नाशिक विमानतळाला अहमदाबाद, बेंगलोर, बेळगाव, भोपाळ, गोवा, हैदराबाद आणि पुणे या विमानतळांशी जोडणाऱ्या आरसीएस मार्गांना मंजुरी मिळाली असल्याचे नमूद केले आहे.
मेसर्स घोडावत (स्टार एअर) ही एअरलाइन्स कंपनी आरसीएस -उडान अंतर्गत चालविली जाते. तथापि प्रवाशांची कमी संख्या आणि मागणीवरून स्टार एअरची नाशिक -बेळगाव ही प्रवासी सेवा बंद करण्यात आली होती.
मात्र आता केंद्रीय मंत्र्यांनी नाशिक -बेळगाव विमानसेवा सुरू करण्याची सूचना केली असून ती जानेवारी 2023 मध्ये पुनश्च सुरू होण्याची शक्यता आहे.