चार महिने ईडीच्या आरोपाखाली तुरुंगात असलेल्या शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांना जामीन मंजूर झाला आहे.
गेल्या अडीच वर्षांच्या काळात उद्धव ठाकरे आणि शिवसेनेची बाजू भक्कमपणे मांडणारे खासदार राऊत यांना पीएमएलए न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
सध्याच्या कसोटीच्या काळात संजय राऊतांना जामीन मिळणे ही ठाकरे गटासाठी मोठा दिलासा मानला जात आहे. संजय राऊत हे सध्या पत्राचाळ घोटाळा प्रकरणात तुरुंगात होते.
गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्याकडून जामिनासाठी प्रयत्न सुरु आहेत. मात्र, अद्याप पीएमएलए कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला नाही. त्यामुळे आजच्या सुनावणीत काय घडणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या होत्या.
तपासयंत्रणेचे सर्व आरोप बिनबुडाचे असल्याचा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता. पीएमएलए न्यायालायने हा युक्तिवाद मान्य करत संजय राऊत यांना जामीन मंजूर केला.