सुगीच्या मोसमात शेतकरी व महिलानीं शेतात जातानां आपल्या बरोबर माचीसचा डबा घेऊन शेताला जाणे अत्यंत गरजेचे बनले आहे. कारण भातकापणीवेळी भातात,बांधावर असलेल्या वेलात, झाडावर,कुंपण असेल तर कुंपणात मधमाशांचे पोळे असू शकते तेंव्हा मधमाशांनी अचानक हल्ला करून दंश करण्यास सुरु केल्यास या गोष्टी करायला हव्यात.
शेतकऱ्यांनी आपलं तोंड,शरीर झाकून घ्याव, जवळ असलेतर वाळलेला चारा घेऊन त्याला पेटवून वरती हिरवा चारा घातल्यास त्याचा धूर झाल्याने मधमाशा पळून जातात.जर दंश जास्त झाल्यास ब्लड प्रेशर वाढते.त्यासाठी जवळ आघाडा असेल तर त्याची थोडी मुळी खाल्यास विषाचा प्रभाव कमी होतो.त्या
नंतर दवाखान्यात जाऊन उपचार करुन घ्यावेत,दुसरा उपाय म्हणजे जवळपास उसाचे पीकं असेलतर त्यात वाकून आडवतिडव लांबपर्यंत जाऊन बसाव किंवा झोपाव.त्यामूळे मधमाशांना तिथे येण्यास अडथळा येतो त्यामूळे आपले संरक्षण होते.
अशीच घटनां गेल्यावर्षीही भातकापणीवेळी घडून एक महिला गंभीर जखमी झाली होती.ती आठ दिवस हॉस्पिटलमधे दाखल होती .
बेळगाव भागात सध्या सुगीचा हंगाम जोरात सुरू आहे भात कापणी सर्वत्र सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांची शेतात जाण्याची लगबग पाहायला मिळत आहे अशावेळी शेतकऱ्यांनी मधमाशा असो किंवा इतर साप इत्यादी कीटकाबपासून आपले संरक्षण करण्यासाठी काळजी घेणे तितकेच गरजेचे बनले आहे.