Saturday, November 23, 2024

/

सीमावादापलीकडे जाऊन एडीजीपींचे कार्य

 belgaum

कर्नाटक – महाराष्ट्र सीमाप्रश्नी दोन्ही राज्यातील जनतेमध्ये, नेत्यांमध्ये नेहमीच वातावरण तापलेले असते. नुकत्याच सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीदरम्यान पुन्हा वातावरण तापल्याने काही काळ महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा बंद करण्यात आली होती. मात्र दोन्ही राज्यात समन्वय आणि सौहार्दपूर्ण वातावरण बनावे या दृष्टिकोनातून एडीजीपी अलोक कुमार यांनी आज निपाणी तालुक्यातील कोगनोळी टोलनाक्यावर महाराष्ट्रातील बस चालक आणि प्रवाशांचे स्वागत केले.

सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर सीमाप्रश्नी दोन्ही राज्यातील सीमावर्ती भाग तसेच कन्नड आणि मराठी भाषिकांमध्ये स्नेहबंध निर्माण व्हावा, दोन्ही राज्यातील जनतेने सौहार्दपूर्ण वातावरणात रहावे, या भावनेतून एडीजीपी अलोक कुमार यांनी आज केलेले कार्य हे कौतुकास पात्र ठरले आहे. महाराष्ट्र परिवहन विभागाच्या बस चालक आणि प्रवाशांना कोगनोळी टोलनाक्यावर गुलाबपुष्प देऊन त्यांनी स्वागत केले.

बेळगावमध्ये शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी एडीपीजीपी अलोक कुमार यांना बेळगावचे आयजी, एसपी आणि स्थानिक पोलिसांनीही पाठिंबा दिला. यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वरील महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रवाशांना त्यांनी गुलाबाचे फुल देऊ स्वागत केले.

बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरातील सर्किट हाऊस येथे एडीजीपी अलोक कुमार यांच्या नेतृत्वाखाली सीमाप्रश्नी उच्चस्तरीय पोलीस अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. मागील आठवड्यात कर्नाटक बसवर महाराष्ट्रात झालेल्या प्रकारानंतर खबरदारी घेत भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, या विषयावर चर्चा करण्यात आली. सर्वोच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीदरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. कोणतेही अनुचित प्रकार घडू नयेत, यासाठी पूर्वखबरदारीसाठी हि बैठक घेण्यात आल्याचे अलोककुमार यांनी सांगितले.Adgp alok kumar

महाराष्ट्र आणि कर्नाटकात तिन्ही बाजुनीही संयुक्त चेकपोस्ट उभारण्यात आल्या सून बेळगाव सीमेवर एकूण २१ चेकपोस्टची उभारणी करण्यात आली आहे. तसेच सुरक्षाही पुरविण्यात आली आहे. कर्नाटकातील ४०० हुन अधिक बस आणि महाराष्ट्रातील १७६ बस राज्यांतर्गत सेवा पुरवत आहेत. दोन्ही राज्यातील वाहनांना कोणतीही अडचण येऊ नये यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली. महाराष्ट्रातील सीमासमन्वयक मंत्री बेळगावमध्ये येत असून कायदा व सुव्यवस्थेला बाधा पोहोचेल अशा कोणत्याही उपक्रमांना आपण परवानगी देणार नसल्याचे एडीजीपींनी स्पष्ट केले.

खासगी कार्यक्रमांना आमचा आक्षेप नाही मात्र कोणत्याही कारणास्तव कायदा व सुव्यवस्था बिघडू नये यासाठी खबरदारी घेण्याचे निर्देश सीमाभागातील सर्व एसपींना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर गस्त देखील वाढवण्यात आली असून आवश्यकता भासल्यास आणखी पोलीस तैनात करण्यात येणार आहेत, असेही एडीजीपी म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.