Monday, January 6, 2025

/

कौटुंबिक वादातून पती-पत्नीसह लहान मुलाचा मृत्यू

 belgaum

कौटुंबिक वादातून पतीने विष प्राशन करून आत्महत्या करण्याबरोबरच पत्नीने देखील पोटच्या मुलाला गळा दाबून ठार केल्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज शनिवारी नवी वंटमूरी येथे घडली.

होळेप्पा मारुती मस्ती (वय 25, रा. नवी वंटमूरी) आणि त्यांची पत्नी वासंती (वय 22) अशी मृतांची नावे असून या दोघांच्या भांडणात त्यांच्या दीड वर्षाच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला. दारूच्या नशेत होळेप्पाचे पत्नीशी भांडण झाले होते.

पत्नीला धमकावण्याच्या उद्देशाने त्याने विषप्राशन केले होते. त्यानंतर त्याच्या मित्रांनी त्याला तातडीने खासगी रुग्णालयात सुद्धा दाखल केले होते. मात्र उपचाराला प्रतिसाद न देता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. तिकडे वैतागलेल्या पत्नी वासंती हिने संतापाच्या भरात आपल्या दीड वर्षाच्या चिमुरड्यांचा गळा आवळून खून केला आणि नंतर झाडाला गळफास लावून घेऊन स्वतःही आत्महत्या केली. मस्ती जोडप्याला आणखी एक 3 वर्षाची मुलगी सुद्धा आहे. मात्र ती त्यावेळी बाहेर खेळायला गेली होती.Vantmuri suicide

वासंती मुलाला उचलून घेऊन गावाबाहेरच्या शेतात गेली होती, ती परत आलीच नाही म्हणून कुटुंबीयांनी शोधाशोध चालू केली. त्यावेळी शेतामध्ये तिचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. तसेच तिच्या पायाखाली तिच्या चिमुकल्याचा मृतदेह सुद्धा पडला होता.

या घटनेमुळे परिसरात खळबळ माजली आहे. यासंदर्भात गावकऱ्यांनी माहिती देतात पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन पंचनामा केला. तसेच मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयाकडे धाडले आहेत.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.