टिळकवाडी तिसऱ्या रेल्वे गेट (लेव्हल क्रॉसिंग नं. 381) येथील नूतन रोड ओव्हर ब्रिज चा उद्घाटन समारंभ येत्या बुधवार दि 12 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे. शहराच्या खासदार मंगला अंगडी यांनी तशी घोषणा केली आहे.
तिसऱ्या रेल्वे गेट येथील रोड ओव्हर ब्रिजचा कोणशीला समारंभ गेल्या 6 जून 2019 रोजी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री दिवंगत सुरेश अंगडी यांच्या हस्ते झाला होता.
त्यानंतर सप्टेंबर 2019 च्या शेवटच्या आठवड्यात या ब्रिजच्या बांधकामाला सुरुवात झाली होती. आता तब्बल तीन वर्षे उलटून गेले तरी या ब्रिजचे बांधकाम म्हणावे तसे पूर्णत्वास आलेले नाही. आजतागायक या ब्रिजच्या चौपदरी मार्गापैकी फक्त दोन मार्ग तयार झाले आहेत.
या ब्रिज बांधकाम पूर्ण करण्याची मुदत मार्च 2022 ही होती. मात्र कोरोना प्रादुर्भावामुळे बांधकाम पूर्ण होण्यास विलंब झाला आणि बांधकाम पूर्ण करण्याची मुदत वाढवण्यात आली. आता हा रोड ओव्हर ब्रिज वाहतुकीसाठी खुल्या करण्याची घोषणा खासदारांनी केली आहे.
सदर चौपदरी रेल्वे ओव्हर ब्रिजसाठी 27.28 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि कर्नाटक सरकार यांच्यामध्ये 50:50 टक्के भागीदारी या तत्त्वावर हा प्रकल्प उभारण्यात आला आहे.
First swich on Street lights on khanapur road railway over bridge