रेल्वे उड्डाण पुलाच्या उदघाटनाच्या दुसऱ्या दिवशी रस्त्यावर खड्डा पडलेल्या बातमीची दखल घेत दक्षिण पश्चिम रेल्वे खात्याने याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
बेळगाव शहरातील तिसरा गेट (लेव्हल क्रॉसिंग क्र. 381) टिळकवाडी बेळगाव येथील रोड ओव्हर ब्रिजचे 12 ऑक्टोबर 2022 रोजी उद्घाटन करण्यात आले. आणि दुसऱ्याच दिवशी 13 ऑक्टोबरला खड्डा पडला रेल्वे खात्यावर सडकून टीका होताच जागे झालेल्या प्रशासनाने 14 ऑक्टोबर रोजी खड्डा दुरुस्त केला.
उड्डाण पुलाची शीलान्यास – 6th जानेवारी 2019
कामाची झालेली सुरुवात -30 Sept 2019
ब्रिज उदघाटन ऑक्टोबर 12, 2022
दुरुस्तीची सुरुवात 14, 2022
ठेकेदाराचे नाव:M/s KRISHI INFRATECH
बेळगावच्या या बातमीची दखल राष्ट्रीय स्तरावरील सी एन एन आय बी एन या वृत्तवाहिनीने घेतल्यामुळे दक्षिण पश्चिम रेल्वेने अधिकृतपणे ब्रिज रस्त्याबाबत स्पष्टीकरण दिले आहे.
रेल्वेच्या अनुसार उड्डाण पुलावरील रस्ता वाहनांच्या हालचालीसाठी संरचनात्मकदृष्ट्या स्थिर आहे. गर्डर आणि ऍप्रोचमधील जंक्शनवर, एका ठिकाणी, पावसामुळे फक्त पृष्ठभागाचे रस्ता खराब झाले होते. त्याचे पुन्हा डांबरीकरण करण्यात आले आहे.
The ROB is structurally stable for vehicular movement. At the junction between girder and approach, at one spot, only the surface bitumin was damaged due to rain. It is being re-asphalted. pic.twitter.com/Z7DIYxdZ2Q
— South Western Railway (@SWRRLY) October 16, 2022