बेळगावच्या स्वीमर्स क्लब आणि एक्वेरियस स्विम क्लबने म्हैसूर येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय दसरा क्रीडा उत्सवातील सीएम कप जलतरण स्पर्धा -2022 मध्ये 6 पदक जिंकून अभिनंदन यश मिळविले आहे.
नाझरबाद म्हैसूर येथील चामुंडेश्वर जलतरण तलावामध्ये गेल्या 30 सप्टेंबर रोजी सीएम कप जलतरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत स्वीमर्स क्लब बेळगाव आणि एक्वेरियस स्विम क्लब बेळगावच्या सनथ अनंत भट, तनष्क मोरे, आदित्य बिर्जे आणि अजिंक्य सुणगार या जलतरणपटूंनी पुढील प्रमाणे यश मिळविले.
सनत भट -100 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 200 मी. बॅकस्ट्रोक कांस्य पदक, 4×100 मी. फ्रीस्टाइल रिले कांस्य पदक. तनष्क मोरे -4×100 मी. फ्रीस्टाइल रिले कांस्य पदक. आदित्य बिर्जे 4×100 मी. फ्रीस्टाइल रिले कांस्य पदक. अजिंक्य सुनगार -4×100 मी. फ्रीस्टाइल रिले कांस्य पदक. हे सर्व जलतरणपटू सुवर्ण जेएनएमसी स्विमिंग पूल येथे पोहण्याचा सराव करतात.
या जलतरणपटूंना जलतरण प्रशिक्षक अक्षय शेरेगार, अजिंक्य मेंडके, नितेश कुडूचकर आणि गोवर्धन काकतकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
राज्यस्तरीय यशाबद्दल केएलई सोसायटीचे अध्यक्ष डाॅ. प्रभाकर कोरे, काहेर विद्यापीठाचे उपकुलगुरू डॉ. विवेक सावजी, रो. अविनाश पोतदार, लता कित्तूर, माणिक कपाडिया, उमेश कलघटगी, सुधीर कुसाणे आणि प्रसाद तेंडुलकर यांनी उपरोक्त जलतरणपटूंचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.