Wednesday, January 15, 2025

/

मच्छे येथे चक्क क्रिकेटचा देव ‘सचिन’चे दर्शन

 belgaum

क्रिकेटमधील देव मानला जाणारा भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर याची प्रत्यक्ष याची देही याची डोळा दर्शन आणि भेट घेण्याचे भाग्य आज सोमवारी सकाळी मच्छे येथील एका कॅन्टीन चालकाला लाभले.

याबाबतची थोडक्यात माहिती आहे की, भारताचा महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर हा आज आपल्या सेक्रेटरी व अन्य कांही सहकाऱ्यांसमवेत मर्सिडीज व इनोव्हा कारने बेळगाव मार्गे गोव्याला रवाना झाला. त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास मच्छे येथील बस स्टॉपच्या ठिकाणी एका कॅन्टीनच्या ठिकाणी सचिनने आपली मर्सिडीज थांबवून त्या कॅन्टीन मधील चहाचा आस्वाद घेतला.

क्रिकेटचा देव साक्षात सचिन तेंडुलकर यांचे कॅन्टीनमध्ये आगमन होताच कॅन्टीन चालकाला प्रथम आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. मात्र आलेली व्यक्ती खरोखर सचिन तेंडुलकर आहे हे लक्षात येताच कॅन्टीन चालकाची एकच धावपळ उडाली आणि त्याने सचिनचा यथोचित पाहुणाचार केला. यावेळी खुल्या दिलाच्या सचिनने त्या कॅन्टीन चालकासोबत फोटो व व्हिडिओ शेअर केला.

त्यावेळी आज सकाळी 8 च्या सुमारास मच्छे येथील बस स्टॉपच्या ठिकाणी एका कॅन्टीनच्या ठिकाणी सचिनने आपली मर्सिडीज थांबवून त्या कॅन्टीन मधील चहाचा आस्वाद घेतला.

Sachin machhe
सचिन तेंडुलकर यांनी मच्छेला धावती भेट दिली तो प्रसंग:फोटो सौजन्य: गजानन जैनोजी

क्रिकेटचा देव साक्षात सचिन तेंडुलकर यांचे कॅन्टीनमध्ये आगमन होताच कॅन्टीन चालकाला प्रथम आपल्या डोळ्यावर विश्वास बसला नाही. मात्र आलेली व्यक्ती खरोखर सचिन तेंडुलकर आहे हे लक्षात येताच कॅन्टीन चालकाची एकच धावपळ उडाली आणि त्याने सचिनचा यथोचित पाहुणाचार केला.सचिनला बेळगावचा चहा आवडला त्यांनी स्वतः पण फोटो काढून घेतले असे त्या टी स्टॉल चालवणाऱ्या युवकाने सांगितले.

टी स्टॉल चालकाने सचिनची स्वाक्षरी घेतली य खुल्या दिलाच्या सचिनने त्या कॅन्टीन चालकाला सेल्फी दिली त्यानंतर हा फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाला.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.