Saturday, December 28, 2024

/

यापुढे व्यापार परवान्याचे नूतनीकरण 5 वर्षातून एकदा

 belgaum

बेळगाव शहरातील व्यवसायिकांसाठी दिलासा देणारी बाब म्हणजे त्यांना आपल्या व्यापार परवान्याचे दरवर्षी करावे लागणारे नूतनीकरण यापुढे 5 वर्षातून एकदाच करावे लागणार आहे. नगर विकास खात्याचे आवर सचिव सतीश कबाडी यांनी नुकताच तसा आदेश जारी केला आहे.

शहरातील व्यावसायिकांना आता दरवर्षी व्यापार परवाना नूतनीकरण करावे लागणार नाही, यापुढे पाच वर्षातून एकदाच परवाना नूतनीकरण करावे लागणार आहे. ज्यांना पाच वर्षासाठी नूतनीकरण नको असेल त्यांना दोन-तीन किंवा पाच वर्षासाठी ही नूतनीकरण करण्याचा पर्याय आहे.

मात्र अशा व्यावसायिकांना परवान्याची मुदत संपण्याच्या 30 दिवस आधी परवाना नूतनीकरण करून घ्यावे लागेल, अन्यथा संबंधित व्यावसायिकावर दंडात्मक कारवाई करण्याचा अधिकार महापालिका तसेच अन्य नगर स्थानिक स्वराज्य संस्थांना दिला आहे.

बेळगाव शहरात गेल्या वर्षभरापासून व्यापार परवान्यावरून वाद सुरू आहे. महापालिकेने व्यापार परवाना सक्ती करू नये, अशी व्यावसायिकांची मागणी आहे. महापालिकेकडून एकदा परवाना घेतला तरी वर्षभरानंतर त्याचे नूतनीकरण करावे लागते.Chougule R m

परवाना शुल्क रक्कम जितकी असेल तेवढेच रक्कम नूतनीकरणावेळी भरावी लागते. मात्र एकदा परवाना घेतला की त्याचे नूतनीकरण केले जात नाही. त्यामुळेच आता नगर विकास खात्याने परवाना नूतनीकरण 5 वर्षातून एकदाच करण्याचा निर्णय घेतला आहे. नगर विकास खात्याचे आवर सचिव सतीश कबाडी यांनी गेल्या 18 ऑक्टोबर रोजी तसा आदेश बजावला आहे.

एकदा परवाना घेतला की थेट पाच वर्षानंतरच त्याचे नूतनीकरण करावे लागणार आहे. मात्र त्यावेळी पाच वर्षाचे शुल्क एकाच वेळी भरून घेतले जाणार आहे. परवाना नूतनीकरणावेळी कागदपत्रांची पडताळणी होणार असून घनकचरा निर्मूलन कायद्याचे पालन केले जाते का? घरपट्टी भरली आहे का? याची पडताळणीही केली जाणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.