गावपातळीवरील नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची ग्रामवास्तव्य मोहीम सुरु आहे.
यासाठी१४ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी नितेश पाटील, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी दर्शन आणि पोलीस अधीक्षक डॉ. संजीव पाटील हे बैलहोंगल, सौंदत्ती या तालुक्यात भेटीसाठी जात आहेत.
बैलहोंगल तहसीलदार कार्यालयात दुपारी १२ वाजता आणि त्यांनतर सौंदत्ती येथील तहसीलदार कार्यालयात दुपारी २ वाजता नागरिकांच्या भेटी घेण्यात येणार आहेत.
या दोन्ही तालुक्यातील जनता अधिकाऱ्यांची भेट घेऊन आपल्या तक्रारी मांडू शकतात. यामुळे या तिन्ही अधिकाऱ्यांच्या भेटीदरम्यान नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले असून यासंदर्भातील परिपत्रक जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी प्रसिद्धीस दिले आहे.