मराठा लाईट इंन्फट्रीचा सतरावा युद्घोत्तर ‘ सिनर्जी ‘पुनर्मिलन मेळावा
मराठा रेजिमेंटने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मार्गाने जात लढवय्या बाणा दाखवून अनेक युद्धे जिंकली आहेत तोच पराक्रम आजही मराठा जवान दाखवत आहेत.स्वातंत्र्यपूर्व स्वातंत्र्योत्तर काळात या रेजिमेंटने आपल्या शौर्याच्या आधारावर अनेक लढाया निर्विवादपणे जिंकल्या आहेत. रेजिमेंटने छत्रपती शिवरायांचा इतिहास लोकांच्या समोर मांडला आहे असे मत लेफ्टनंट जनरल अजय सिंह यांनी मांडले.
मराठा लाईट इंन्फट्रीचा सतरावा युद्घोत्तर ‘ सिनर्जी ‘पुनर्मिलन मेळावा अंदमान निकोबार द्वीपसमूहाचे कमांडर इन चीफ लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांच्या उपस्थितीत पार पडला.मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटर येथे आयोजित पुनर्मिलन मेळाव्याला आजी माजी सैनिक उपस्थित होते.
भारत सरकारचे सहसचिव मेजर जनरल के.नारायणन यांच्यासह दहा आजी माजी लेफ्टनंट जनरल आणि एकोणीस मेजर जनरल उपस्थित होते.कोल्हापूरचे छत्रपती श्रीमंत शाहू महाराज यांची विशेष उपस्थिती होती.तिन्ही संरक्षण दलांचे मिलिटरी बँडच्या तालावर झालेले शानदार संचलन मेळाव्याचे आकर्षण ठरले.
मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंट मधील सात कंपन्या ,बॉम्बे इंजिनियरिंग ग्रुप,आय एन एस मुंबई नौदलाचे पथक,इंडीयन एअर फोर्सचे पथक आणि दमण येथील कोस्ट गार्डचे पथक संचलनात सहभागी झाले होते.लेफ्टनंट जनरल अजय सिंग यांनी संचलनाची पाहणी करून मानवंदना स्वीकारली.
मराठा लाईट इंन्फट्रीचे सिल्व्हर बँड आणि पाईप बँडने सुरेल धून वाजवून उपस्थितांची मने जिंकली.मेळाव्याला देशभरातून आजी माजी सैनिक सहभागी झाले असून सोमवारी मेळाव्याची सांगता होणार आहे.मराठा लाईट इंन्फट्री रेजिमेंटल सेंटरचे कमांडंट जॉयदिप मुखर्जी यांच्या नेतृत्वाखाली मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. सैनिक,अधिकारी आणि त्यांचे कुटुंबीय मेळाव्याला उपस्थित होते.
कर्तव्य , मान आणि साहस या त्रिसूत्रीवर आधारित अतुलनीय पराक्रमाची अडीचशे वर्षांची वैभवशाली परंपरा असणाऱ्या मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर येथे दि . १५ ते १७ ऑक्टोबर दरम्यान १७ वा युद्धोत्तर पुनर्मिलन सोहळा ( पोस्टवॉर री – युनियन ) साजरा आहे . माजी लष्करप्रमुख जनरल जे . जे . सिंग, यामध्ये सात तुकडी मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बॉम्बे इंजिनीअर ग्रुप ३ एअरफोर्सचे प्रतिनिधित्व करणारी एकरमन ट्रेनिंग स्कूल सांबरा , इंडिया स्टेशन (दमण )लष्कराचा CON मराठा लाइट सिल्व्हर बॅण्ड सहभागी झाले होते.