Saturday, January 4, 2025

/

मध्यवर्ती समितीची मुख्यमंत्र्यांशी चर्चा

 belgaum

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने चर्चा केली असून आगामी काळा दिन आणि सुप्रीम कोर्टातील सुनावणी विषयी शिंदे यांनी ठोस पाऊले उचलण्याचे असे आश्वासन दिले आहे.

मध्यवर्ती म ए समितीच्यावतीने खजिनदार प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी फोनवरुन संपर्क साधला आणि त्यांच्याशी चर्चा केली. 1नोव्हेंबर 2022रोजी सीमा भागात म.ए.समितीच्या वतीने काळादिन पाळण्यात येतो या दिवशी होणाऱ्या जाहीर सभेसाठी महाराष्ट्र सरकारच्यावतीने प्रतिनिधी पाठवून द्यावा अशी विनंती केली याला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नाबाबत सर्वोच्च न्यायालयातील दावा लवकरात लवकर सुरु होण्यासाठी आवश्यक ते सारे लवकर करावे. उच्चाधिकार समितीची आणि तज्ज्ञ समितीची बैठक बोलावून सविस्तर चर्चा करावी.

Prakash margale
Senior mes leader Prakash margale

मुंबईतील सीमा कक्ष वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांची नेमणूक ताबडतोब करण्यात यावी. महाराष्ट्राचे दिल्लीतील वकील शिवाजीराव जाधव यांनी ज्येष्ठ वकील नेमणूकीसंदर्भात पाठविलेल्या पत्राची दखल घेऊन त्वरित कार्यवाही करावी अशीही विनंती प्रकाश मरगाळे यांनी केली.

यासंदर्भात त्वरित कार्यवाही करण्यात येईल असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.