यंदा बेळगावमध्ये गल्लोगल्ली मोठ्या धुमधडाक्यात नवरात्रोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून बेळगाव शहर, उपनगर आणि तालुक्यात देखील ठिकठिकाणी देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे.
सोमवारपासून सुरु झालेल्या शारदीय नवरात्रोत्सवानिमित्त भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल सुरु आहे. सांस्कृतिक, मनोरंजनात्मक, धार्मिक कार्यक्रम तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून बेळगावमधील कांगली गल्ली, समर्थ नगर, तानाजी गल्ली आणि किल्ला परिसरात महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शनिवार दिनांक १ ऑक्टोबर रोजी रात्रौ ८ वाजता एसटीएम समर्थ नगर येथील श्री नवरात्री उत्सव मंडळाचा, रविवार दिनांक २ ऑक्टोबर रोजी कांगली गल्ली येथील एकता युवक मंडळाच
तर मंगळवार दिनांक ४ ऑक्टोबर रोजी तानाजी गल्ली आणि किल्ला येथील नवरात्री उत्सव मंडळातर्फे महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन नवरात्री उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.