बेळगाव शहरात सध्या बांगडा माशाची आवक वाढली असून शहरातील फिश मार्केट व कमाई गल्लीसह किल्ल्यासमोरील कॅन्टोन्मेंटच्या खुल्या जागेत सध्या मोठ्या प्रमाणात बांगडा खरेदी-विक्रीची उलाढाल होत आहे.
बेळगाव शहरात कॅम्प येथे आणि दुसरे कसाई गल्लीमध्ये अशा दोन ठिकाणी मासे विक्रीची अधिकृत केंद्रे म्हणजे फिश मार्केट्स आहेत. या माशाच्या बाजारात वेगळ्या प्रकारचे मासे किरकोळ आणि घाऊक (रिटेल -होलसेल) स्वरूपात विक्रीसाठी उपलब्ध असतात. मात्र ज्यावेळी फक्त चविष्ट बांगडा माशाचा सीझन असतो त्यावेळेला किल्ल्याजवळील भरतेश शिक्षण संस्थेसमोरील कॅन्टोन्मेंटच्या खुल्या मैदानात बांगड्यांचा होलसेल बाजार भरत असतो.
सध्या शहरातील वरील तीनही ठिकाणी बांगड्यांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. जवळपास कारवार, मलपे आणि मालवण या भागातून दररोज सुमारे 15 ते 20 हून अधिक टेम्पो भरून बांगडे विक्रीसाठी बेळगावात येत असतात.
बांगड्यांची आवक वाढल्यामुळे सध्या किल्ला येथे त्यांचा मोठा बाजार भरत आहे. या ठिकाणी बांगडा माशाचा होलसेल पद्धतीने दिला होत असून त्यामध्ये बोली लावण्यासाठी विक्रेत्यांची गर्दी होत आहे. दुचाकीवरून घरोघरी फिरून विक्री करण्यासाठी तसेच दुकानात विक्रीस ठेवण्यासाठी व्यापारी व फिरते विक्रेत्यांची सध्या भल्या सकाळी या बाजाराच्या ठिकाणी बांगडा खरेदीसाठी गर्दी होताना पहावयास मिळत आहे.
किल्ला येथील होलसेल बाजारातून माशांची खरेदी करून बेळगाव जिल्ह्यासह बेळगाव शहर परिसर आणि तालुक्यात नेऊन विक्री केली जाते. बांगडा खरेदीसाठी सध्या दररोज शेकडोच्या संख्येने लहान-मोठे व्यापारी किल्ल्यासमोरील बाजारात मासे खरेदीसाठी येत आहेत. या आज शुक्रवारी जवळपास 25 टेम्पो इतकी मोठ्या प्रमाणात बांगड्यांची आवक या ठिकाणी झाली आहे.
त्यामुळे आज 30 किलो बांगड्याच्या पेटीची अंदाज साधारण 1000 ते 1500 रुपये इतक्या दराने विक्री होत होती. म्हणजे साधारणपणे 30 रुपये 35 रुपये किलो इतक्या होलसेल दराने बांगड्याची विक्री झाली. आवक वाढल्यामुळे सध्या शहरासह ग्रामीण भागात वेगवेगळ्या पद्धतीने हे फिरून बांगड्यांची विक्री होत असल्याचे पहावयास मिळत आहे.