उद्यमबाग येथील प्लस -वन मशीन फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी सिंगल रॅम डिझाईनसह तब्बल 4000 टन क्षमतेची हायड्रोलिक मशीन बनविणारी देशातील पहिली कंपनी ठरली आहे.
शीतकरण सोय आणि इलेक्ट्रिक हीटेड प्लेटन्स असणारी सदर 4000 टनी एफआरपी /एसएमसी शीट मोल्डिंग प्रेस मशीन अल्फा एंटरप्राइजेस पुणे या कंपनीसाठी तयार करण्यात आली आहे. या मशीनच्या सहाय्याने अल्फा एंटरप्राईजेस भू-सुरंग प्रतिबंधक संरक्षणात्मक एफआरपी शीट तयार करणार आहे.
सदर एफआरपी शीट बुलेटप्रूफ जॅकेटसाठी सुद्धा वापरले जाऊ शकतात. अल्फा इंटरप्राईजेसने यापूर्वी या शीटद्वारे एके -47 बंदुकीच्या गोळ्यांची यशस्वी चांचणी घेतली आहे. सदर मशीनची इलेक्ट्रिक कनेक्ट लोड घेण्याची क्षमता 290 अश्वशक्ती इतकी असून मशीनचे वजन 90 टन आहे.
ही मशीन तयार करताना देशातील विविध ठिकाणी तयार केलेले उत्कृष्ट दर्जाचे भाग (पार्टस) वापरण्यात आले आहेत. सदर मशीन पीएलसी कंट्रोल आणि टच स्क्रीन एचएमआयसह संपूर्णपणे स्वयंचलित आहे.
दर्जेदार तसेच विश्वासार्ह उत्कृष्ट उत्पादनासाठी सुपरिचीत असलेल्या उद्यमबाग येथील प्लस -वन मशीन फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीला यापूर्वी तत्कालीन पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या हस्ते 2000 साली उत्कृष्ट उद्योजकतेसाठी असलेले देशातील प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळाले आहे. प्लस वन कंपनीचा अत्यंत प्रगत अशी हायड्रोलिक मशीन्स त्याचप्रमाणे पॉलिमर आणि धातू निर्मिती उद्योगाशी संबंधित उपकरणे बनवण्यात हातखंडा आहे.
प्लस -वन मशीन फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या मशीन्सचा देशभरात पुरवठा केला जातो. आपोलो टायर्स, जेके टायर्स, एक्सल रबर, कारबोरुंडम युनिव्हर्सल, थरमॅक्स लिमिटेड, आयएसआरओ, डीआरडीओ, गरवारे फुलफ्लेक्स, विंड इंडिया लिमिटेड, एमआरएफ टायर्स, पाॅलीबोंड इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, इमराल्ड रिसायलेंट टायर्स, करारो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, वॅकर मेट्रोर्क केमिकल्स आदी देशातील मातब्बर कंपन्या प्लस वन कंपनीच्या ग्राहक आहेत.
याखेरीज या कंपनीच्या मशीन्स युएई, सौदी अरेबिया, कुवेत, रशिया, नेपाळ, इस्राइल, हंगेरी आदी देशात निर्यात केल्या जातात. प्लस -वन मशीन फॅब्रिक प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जे. एच. कुरणे हे असून एम. पी. पत्की वर्क डायरेक्टर आहेत.
अभिनंदन