कुरबुर समाजाचा अनुसूचित जातीमध्ये समावेश करण्यात यावा या मागणीसाठी कर्नाटक प्रदेश कुरबुर संघातर्फे (केपीकेएस) बेळगाव येथे आंदोलन छेडून निदर्शने करण्यात आली.
याप्रसंगी पत्रकारांशी बोलताना केपीकेएस जिल्हाध्यक्ष मडिप्पा एल. तोळीनावर यांनी कुरबुर समाज हा आर्थिक शैक्षणिक आणि राजकीय दृष्ट्या अत्यंत मागासलेला आहे.
कोडगू, बिदर, कलबुर्गी आणि यादगिर या जिल्ह्यांमध्ये यापूर्वीच आमच्या समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समावेश करण्यात आला आहे. याचे अनुकरण राज्यातील इतर जिल्ह्यांमध्ये देखील झाले पाहिजे, असे स्पष्ट केले.
सरकारने वंशावळीचा अभ्यास करण्यासाठी आता म्हैसूर येथे आदिवासी संशोधन संस्था नियुक्त केली आहे. या संस्थेचा संबंधित अहवाल तयार असून आमची मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी केंद्र सरकारकडे शिफारस करून आमच्या समाजासाठी अनुसूचित जमाती राखीवता मंजूर करून घ्यावी.
कनक जयंती दरम्यान येत्या 11 नोव्हेंबर रोजी कुरबुर समाजाचा अनुसूचित जमातीमध्ये समाविष्ट करण्याची शिफारस मुख्यमंत्र्यांनी केंद्राकडे करावी. आमची ही मागणी मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलन छेडून निदर्शने केली जातील, असा इशाराही मडिप्पा तोळीनावर यांनी दिला.