Sunday, December 22, 2024

/

अस्वच्छता पसरवण्याच्या प्रकाराबद्दल ‘यांचे’ आवाहन

 belgaum

बेळगाव शहरानजीकच्या बामणवाडी येथील शांताई वृद्धाश्रमाच्या रस्त्याशेजारी औद्योगिक वसाहतीतील कचरा टाकून अस्वच्छता पसरवण्याचे गैरकृत्य केले जात आहे. तेंव्हा उद्योजकांसह महापालिका व आसपासच्या ग्रा. पं. अधिकाऱ्यांनी याची गांभीर्याने दखल घेऊन तात्काळ योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते माजी महापौर विजय मोरे यांनी केली आहे.

शांताई वृद्धाश्रमाकडे जाणाऱ्या रस्त्याशेजारी औद्योगिक वसाहतीतील केरकचरा आणि टाकाऊ वस्तू फेकून अस्वच्छता व दुर्गंधी पसरण्याचे काम कांही ट्रॅक्टर चालक करत आहेत. शांताईला भेट देण्यासाठी येणाऱ्या लोकांनी जाब विचारल्यास शिवीगाळ करण्याबरोबरच तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, पण आम्ही कचरा इथेच टाकणार असे सांगून धमकावले जात आहेत. तरी औद्योगिक वसाहतीतील माझ्या उद्योजक मित्रांनी याची नोंद घ्यावी.

तसेच तुम्ही ज्या ट्रॅक्टरवाल्यांना कचरा टाकण्याचे काम सांगितलेले असते अशा लोकांना कचऱ्याची विल्हेवाट योग्य ठिकाणी लावण्याची सक्त ताकीद द्यावी, अशी माजी महापौर या नात्याने मी आपल्याला विनंती करत आहे, असे सामाजिक कार्यकर्ते विजय मोरे यांनी म्हंटले आहे.Cleanness need

त्याचबरोबर रस्त्यावर कोठेही या पद्धतीने मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्यात येत असल्याचे आढळून आल्यास नागरिकांनी त्या कचरा वाहू वाहनाचा नंबर मोबाईलवर फोटो काढून माझ्याकडे पाठवावा असे आवाहनही माजी महापौर विजय मोरे यांनी केले आहे. संपूर्ण बेळगाव शहराच्या आजूबाजूला अशा पद्धतीचे कचरा नेऊन टाकण्याचा जो प्रकार चालला आहे, त्याला आळा घालण्यासाठी बेळगाव महानगरपालिका आणि आजूबाजूच्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांनी तात्काळ पावले उचलणे गरजेचे आहे. कारण मालकांना माहीत नसताना ट्रॅक्टर चालक दूरवर जाण्याचे टाळण्यासाठी आजपासून कोठेही कचरा टाकून बेळगावच्या सौंदर्याला धक्का पोहोचवत आहेत.

अशा ट्रॅक्टरवाल्यांवर बेळगाव पोलीस प्रशासनाने देखील कारवाई केली पाहिजे. बेळगाव स्वच्छ व सुंदर ठेवण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. तरी परत एकदा मी सर्व फॅक्टरी मालकांना हात जोडून विनंती करतो की तुमच्या फॅक्टरी मधील कचरा कुठेही टाकून अस्वच्छता पसरवत बेळगावच नांव खराब करणाऱ्या संबंधित ट्रॅक्टर चालकावर त्यांनी देखील कारवाई करावी, असे मोरे यांनी स्पष्ट केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.