सालाबादप्रमाणे बेळगाव जिल्हा शिवसेना (सीमाभाग) यांच्यावतीने उद्या शुक्रवार दि. 21 ऑक्टोबर ते रविवार दि. 20 नोव्हेंबर 2022 या कालावधीत शिवकालीन भव्य किल्ला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा बेळगाव शहर, शहापूर, वडगाव व अनगोळ या चार विभागांमध्ये घेण्यात येणार आहे. युवक मंडळ व सामान्य नागरिकांसाठी ही स्पर्धा खुली आहे. स्पर्धेसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. शिवभक्तांना कोणत्याही ऐतिहासिक किल्ल्याची प्रतिकृती साकारता येईल.
ही किल्ला स्पर्धा उद्यापासून येत्या 20 नोव्हेंबर पर्यंत चालणार आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे विचार अबालवृद्धांपर्यंत पोहोचवण्याचे काम शिवसेनेने केले आहे. यापुढेही शिवसेना हे कार्य सुरूच ठेवणार आहे. आजकालची युवा पिढी अनेक व्यसनामध्ये गुंतत आहे.
यंदाच्या या स्पर्धेत भाग घेऊ इच्छिणाऱ्यांनी येत्या दि. 30 ऑक्टोबर 2022 पर्यंत प्रकाश राऊत इलेक्ट्रिकल्स बापट गल्ली, बेळगाव (मो. क्र. 9880143331), सोनू डी.टी.पी. नाथ पै चौक शहापूर (मो. क्र. 7795322398) अथवा भाऊ केरवाडकर मंगाईनगर, दुसरा क्रॉस वडगाव येथे नावे नोंदवावीत. तसेच स्पर्धेसंदर्भात अधिक माहितीसाठी आपल्याशी 8050420052 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन शिवसेना बेळगाव उपजिल्हाप्रमुख बंडू केरवाडकर यांनी केले आहे.