Saturday, December 28, 2024

/

सिमोल्लंघनासाठी शहरवासियांना आवाहन

 belgaum

सालाबाद प्रमाणे बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्यावतीने उद्या बुधवार दि. 5 ऑक्टोबर 2022 रोजी सायंकाळी 5:30 वाजता ज्योती कॉलेज (मराठी विद्यानिकेतन) मैदानावर सिमोल्लंघन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सिमोल्लंघनादिवशी चव्हाण गल्लीतील पंच कमिटीच्यावतीने श्री ज्योतिबा देवाची सासन काठी व नंदी (कटल्या) यांची विधिवत पूजा करून मिरवणूक निघते. शहरातील इतर देवी -देवतांच्या पालख्या व सासन काठ्या हुतात्मा चौक येथे जमतात. चव्हाण गल्लीतील पालखी सासनकाठी व नंदी यांना अग्रस्थान देऊन सदर मिरवणूक सिमोल्लंघन मैदानाकडे सवाद्य मार्गस्थ होते.

या ठिकाणी बेळगावचे वतनदार पाटील यांच्या घरानाकडे असलेल्या पारंपारिक तलवारींचे शस्त्र पूजन चव्हाण -पाटील परिवार व देवस्थान मंडळाकडून केले जाते. यानिमित्ताने बेळगाव शहर देवस्थान मंडळाच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात येतो. हे सर्व कांही उद्या बुधवारी 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे.

तरी सर्व देवस्थान मंडळाचे मानकरी, पुजारी, आजी-माजी लोकप्रतिनिधी यांच्यासह समस्त शहरवासियांनी या कार्यक्रमास उपस्थित राहून तो यशस्वी करावा, असे आवाहन बेळगाव शहर देवस्थान मंडळातर्फे अध्यक्ष रणजीत चव्हाण -पाटील आणि सेक्रेटरी परशराम माळी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.