बेळगाव जिल्हा तायक्वांदो संघाने राष्ट्रीय चॅम्पियनशिपमध्ये स्पर्धेत एकूण ३६ पदकांसह वेस्टार्स चषक २०२२ जिंकण्यात यश मिळवले आहे.वेस्टार्स चषक राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिप २०२२ अखिला कर्नाटक स्पोर्ट्स अँड आर्ट अकादमी द्वारे आयोजित असून वेस्टर तायक्वांदो अकादमी द्वारे नेहरू युवा केंद्र, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय (भारत सरकार) यांच्या संयुक्त विद्यमाने १४, १५ आणि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी कडप्पा परमहंस सभांगण, मागडी रोड, बेंगळुरू येथे पार पडला होता.
चॅम्पियनशिप मिनी सब ज्युनियर, सब ज्युनियर, कॅडेट, ज्युनिअर आणि सीनिअर वयोगटांमध्ये क्योरुगी (स्पॅरिंग) आणि पूमसे (पॅटर्न) या दोन्ही विभागात आयोजित करण्यात आली होती. मॅन्युअल स्कोअरिंग सिस्टीम च ना वापर करता, वर्ल्ड तायक्वांदो संस्थेच्या मानकांनुसार प्रोटेक्टिव्ह आणि इलेक्ट्रॉनिक स्कोअरिंग सिस्टीमचा वापर करण्यात आला. या स्पर्धेत तामिळनाडू, केरळ, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, हरियाणा आणि नवी दिल्ली येथील १८०० हून अधिक खेळाडू सहभागी झाले होते.
बेळगाव जिल्ह्यातून निवडलेला तायक्वांडो खेळाडू कर्नाटक राज्याचा प्रतिनिधित्व करून मिनी सब ज्युनियर वय घटात मुलांचे विभागात विआन सरकार ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पूमसे मध्ये कांस्य पदक, श्रेयसगौडा गौरी ने पुमसे मध्ये रौप्य पदक, सिद्धार्थगौडा गौरी ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक, वेदांत खडबडी ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक तसेच मुलींचं विभागात विहानी हुंद्रे ने पुमसे मध्ये रौप्य पदक पटकाविले. सब ज्युनियर वय घटात मुलांचे विभागात घगन शिवपूजीमठ ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक, मोहम्मद शफी चांदशाह ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक, मोहम्मद सोहेब चांदशहा ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक,
आरुष टूमरी ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक, पवनराज दड्डीकर ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक, आकाश डाकनाईक ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तसेच मुलींचं विभागात राजनंदिनी पाटील ने क्योरुगी मध्ये कांस्य तर पूमसे मध्ये रौप्य पदक, जिया पुजारी ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक, त्रिशा मानव ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक, स्वर्णिका शेडबाळे ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. कॅडेट वय घटात मुलांचे विभागात अथर्व मांगले ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक, स्पर्श भोसले ने क्योरुगी मध्ये सुवर्ण पदक तर पूमसे मध्ये रौप्य पदक, आदित्य डाकनाईक ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक पटकाविले. ज्युनिअर वय घटात मुलांचे विभागात रुतिकेश कागले ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक पूमसे मध्ये रौप्य पदक, सुजल शिरोळे ने क्योरुगी मध्ये रौप्य पदक तर पुमसे मध्ये सुवर्ण पदक पटकाविले. १५ सुवर्ण पदके , १९ रौप्य पदके आणि २ कांस्य पदके असे एकूण ३६ पदके जिकून संघाने वेस्टार चषक प्राप्त केले.
हा खेळाडू जिल्हा संघाहशी सलग्न असलेला काकती, सांब्रा, मुतगा, खासबाग, चिक्कोडी, पट्टनकुडी, अकोळ व गोकाक यथील प्रशिक्षण केंद्रात सराव करीत आहेत.संघाचे नेतृत्व जिल्हाध्यक्ष अॅड प्रभाकर शेडाबळे आणि भारतीय वायुसेनेचे आंतरराष्ट्रीय तायक्वांदो प्रशिक्षक श्रीपाद रवी राव यांनी केले. स्वप्नील आर पाटील यांची संघ प्रशिक्षक म्हणून आणि संदेश पाटील यांची संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
याशिवाय बेळगावचे तायक्वांदो रेफरी वैभव पाटील, जितेश पुजारी, श्रेया अतिवाडकर, श्रीराज पाटील, त्रिवेणी बडकन्नवर, वज्रकुमार, निशांत गायकवाड, विजय बेडगे आणि वीरकुमार सुदगडे यांची स्पर्धेत ऑफिसियल म्हणून काम पाहिले.तायक्वांडो जिल्हा सचिव महादेव मुत्नाळे आणि राणी चेन्नमा विश्वविद्यालयाचे क्रीडा निर्देशक जगदीश गस्ती हा यश बद्दल सहर्ष व्यक्त केले.