बेळगावात बैलहोंगल येथील एका 19 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू झाला असून बलात्कारानंतर तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोप मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी केल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
संशयास्पद मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव तब्बसूम सवदत्ती (वय 19, मूळ रा. बैलहोंगल जि. बेळगाव) असे आहे. बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयातीने अखेरचा श्वास घेतला तब्बसूम बेंगलोर येथील एका खाजगी कंपनीत काम करत होती मृत तब्बसूमचे वडील इम्रान अहमद सवदत्ती हे ऑटोरिक्षा चालक आहेत.
तब्बसूम तिला अज्ञात तरुणाने बेळगाव सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले मात्र आपल्यावर गुन्हा दाखल होणार असल्याचे समजतात तो हॉस्पिटल मधून तब्बसूमच्या मोबाईलचे सिम घेऊन फरारी झाला. फरारी तरुणाने काल रात्री तब्बसूमच्या आईला व्हाट्सअपवर संदेश पाठविला. “ते वेडे आहेत का?… बसमधून उतरताना तब्बसूमचा मोबाईल फुटला. तिचे सिम माझ्या मोबाईलमध्ये घालून मेसेज करतोय. तिचा मोबाईल एका छोट्या बॅगेत आहे. तिचे सिम तोडून टाकतोय. दुसरे सिम घ्या. मला त्रास देऊ नका.” असे त्या संदेशात नमूद आहे.
तब्बसूमने गेल्या 11 ऑक्टोबर रोजी आपली आई शबिरा बानू हिला मेसेज करून आपण बेंगळूरहून बेळगावला येणार असल्याचे सांगितले होते. त्यावेळी तिने तिचा सेल्फी फोटोही पाठवला होता. त्यात तब्बसूम जखमी होऊन तिचा चेहरा सुजलेला दिसत होता. आता बेळगावात आल्यानंतर तिचा असा संशयास्पद मृत्यू झाल्याने सवदत्ती कुटुंबीयांना धक्का बसला आहे. आपला मुलीचा मृत्यू संशयास्पद असल्यामुळे त्याची सखोल चौकशी करून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
एवढेच नाही तर तब्बसूमच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचे दिसून आल्याचे तिच्या कुटुंबीयांचे म्हणणे आहे. तब्बसूमवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.स
सवदत्ती कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आले असता बेशुद्ध अवस्थेतील तब्बसूमच्या डोक्याच्या मागील बाजूस मारहाणीच्या खुणा आढळून आल्या. त्यानंतर त्यांनी तिला खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले होते. मात्र दुर्दैवाने आज गुरुवारी सकाळी उपचाराचा फायदा न होता तब्बसूमचा मृत्यू झाला.
त्यावेळी मुलगी गमावलेल्या सवदत्ती कुटुंबीयांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकत होता. शहरातील एपीएमसी पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात ही घटना घडली आहे.