सौन्दत्ती चे मतदार संघाचे आमदार आणि उपसभापती आनंद मामनी यांची तब्येत काहीशी खालावल्याने त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेल्या आनंद मामनी यांची तब्येत खालावल्याने त्यांना चेन्नई येथील रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. आनंद मामनी यांना मधुमेहाचा त्रास असून यावर ते चेन्नई येथे उपचार घेत आहेत.
डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे. आनंद मामनी यांचे पुतणे चेन्नई येथे आयएएएस अधिकारी आहेत. सध्या ते आपल्या पुतण्याच्या घरी विश्रांती आणि उपचार घेत असून गुरुवारी पुन्हा तपासणी होण्याची शक्यता आहे.
याऐवजी त्यांना इतर कोणताही आजार नसल्याचेही सांगण्यात आले आहे.