Saturday, January 18, 2025

/

दक्षिण मतदार संघासाठी गुप्त रणनीती : सतीश जारकीहोळी

 belgaum

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बेळगावमधील राजकीय घडामोडींमध्ये आतापासूनच बदल होत असून आरोप-प्रत्यारोप, आणि टीकेच्या फैरी झडत आहेत. काँग्रेस वर्सेस भाजप हे वाक्युद्ध नेहमीपेक्षा गतिमान झाले असून भाजपने काँग्रेसवर केलेल्या टीकेचा, आरोपांचा समाचार घेत केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी भाजपाची खिल्ली उडविली आहे. तसेच बेळगाव दक्षिण मतदार संघाच्या दृष्टिकोनातून काँग्रेसच्या रणनीतीसंदर्भात महत्वपूर्ण खुलासाही केला आहे.

बेळगाव दक्षिण मतदार संघात काँग्रेसचा उमेदवार उभा करण्यासाठी कार्यकर्त्यांची मागणी जोर धरू लागली आहे. या दृष्टिकोनातून काँग्रेस आतापासूनच रणनीती आखात असून सर्व गोष्टी आताच जाहीर केल्या तर विरोधकांना आयते कोलीत हातात मिळेल, आणि आपली रणनीती फोल ठरेल, यासाठी काँग्रेस गुप्तपणे रणनीती आखत आहे, सर्व गोष्टी निवडणूक जवळ आल्यानंतर अखेरीस उघड केल्या जातील, अशी प्रतिक्रिया सतीश जारकीहोळी यांनी दिली.

मुख्यमंत्री बसवराज बोम्मई हे नुकतेच हैद्राबाद येथील दौऱ्यावर गेले असता त्याठिकाणी बॅनरबाजी करण्यात आली. ४० टक्के कमिशनचे सरकार हैद्राबाद मध्ये येतSatish jarkiholi असल्याचा मजकूर बॅनरवर छापण्यात आला.

आपल्या देशातील हा मोठा विक्रम असून याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये व्हावी, अशा शब्दात सतीश जारकीहोळी यांनी खिल्ली उडविली. काँग्रेसच्या भारत जोडो या पदयात्रेवरून भाजपमधून होत असलेल्या टीकेवर प्रतिक्रिया देत ते म्हणाले, भारताची फाळणी हि ब्रिटिशांच्या काळात झाली.

बांगलादेश पाकिस्तानचा भाग होता. यावेळी अनेक अनुचित घटना घडल्या. याचा विचार करून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांगलादेश पाकिस्तानपासून वेगळा केला, हि बाब चांगली असल्याचेही ते म्हणाले.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.