Monday, December 23, 2024

/

अन…गर्दीने फुलू लागले आहे बेळगाव शहर

 belgaum

बाप्पाचे आगमन होऊन साधारण 9 दिवसाचा कालावधी उलटला आहे.यामुळे गणेश भक्तामधील उत्साह वाढला असून देखावे पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होऊ लागली आहे.बुधवारी रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी आलेल्या भक्तांमुळे रस्ते गर्दीने फुलले होते. भव्य मूर्ती आणि अर्थपूर्ण देखावे यामुळे भक्तांचा उत्साह द्विगुणीत होत असून शहराबरोबरच शहापूर वडगाव अनगोळ आणि इतर उपनगरीय भागांमधून रात्री उशिरापर्यंत देखावे पाहण्यासाठी गर्दी होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

बाप्पाच्या विसर्जनासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असल्याने नागरिकांची तोबा गर्दी होऊ लागली आहे. सातत्याने पावसाची हजेरी लागत असल्याने नागरिकांची निराशा होत आहे मात्र रात्रीच्या वेळी पाऊस थांबतात पुन्हा देखावे पाहण्यासाठी भक्तमंडळी बाहेर पडत आहेत यामुळे शहरातील रस्ते गर्दीने फुलून गेले आहेत. विविध मंडळाकडून प्रसाद म्हणून देण्यात येणारा नाश्ता याचा लाभ घेत असून मंडळांच्या बाहेर थाटण्यात आलेली खाऊची दुकाने यांवर देखील गर्दी होत आहे.

मागील दोन वर्षे कोरोनाच्या काळात गणेशोत्सव साध्या पद्धतीने करण्यात आला यामुळे देखावे पाहण्याची संधी भाविकांना मिळाली नव्हती मात्र यंदाचा गणेशोत्सव सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत असताना विविध मंडळांनी केलेले देखावे भव्य अशा गणेश मूर्ती पाहत गणेश दर्शनाचा लाभ घेत आहेत. शहराबरोबरच ग्रामीण भागातील भाविक देखील गणेश दर्शनाचा लाभ घेत असून मध्यरात्रीपर्यंत रस्ते भक्तांनी फुलले असल्याचे दिसून येत आहे.

मागील दोन दिवसापासून सायंकाळनंतर पाऊस हजेरी लावत असून परिणामी नागरिकांची निराशा होत आहे मात्र आता गणेश विसर्जनाला केवळ दोनच दिवस शिल्लक राहिले आहेत.यामुळे बुधवारी व गुरुवारी रात्री गणेश दर्शनासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून विविध मंडळांनी साकारलेले देखावे व्हायरल होत असल्याने ते प्रत्यक्षात पाहण्यासाठी आवर्जून भक्तमंडळी त्या त्या ठिकाणी उपस्थित राहत आहेत.ठिकठिकाणी मंडपासमोर देखावे पहाण्यासाठी मोठी गर्दी होत आहे त्या गर्दीत प्रत्येकाच्या हातात मोबाईल गणेशाचा फोटो किंवा सेल्फी काढून घेण्याची गर्दीही खूप होत आहे. Ganesh chaturthi rush

पावसाचे वातावरण असले तरी देखील रेनकोट छत्री याचा वापर करून देखावे पाहण्यासाठी भक्तमंडळी बाहेर पडू लागले आहेत.विशेषतः दुचाकीवरून गणेश दर्शन पाहण्याकडे मोठा असून रस्त्यांवरून जोरजोरात वाहनांचे आवाज आणि वाहनांचीच गर्दी दिसून येऊ लागली आहे. उपनगरीय भागातून तसेच ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची बस अभावी गैरसोय होत असल्याने विशेष करून खाजगी वाहनातूनच गणेश दर्शन पाहण्याकडे कल वाढला आहे.

सुरू असलेल्या गणेश उत्सव हा लोकांच्या मोठ्या प्रमाणात उत्साही वातावरण निर्माण करणारा ठरला आहे तरुणाई बरोबरच अबाल वृद्ध रस्त्यावर उतरले होते रात्रीच्या वेळी जे चहा नाश्ता असे व्यावसायिक आहे त्यांचीही मोठ्या प्रमाणात व्यापार होऊन आर्थिक बाजूही मजबूत होत चालली आहे एकंदर गणेशोत्सवामुळे अर्थकारण समाजकारण आणि देवकारण हे सगळे चरण सीमेवर आहे. गणेशोत्सवाची संधी साधत अनेक राजकीय नेत्यांनी स्वतःचे डिजिटल बोर्ड लावून ह्या उत्सवात राजकारणी साधले आहे. शुक्रवारी गणेश विसर्जन होणार आहे त्यामुळे गुरुवार हा देखावे पाहण्यासाठी चा शेवटचा दिवस असल्याने जर पावसाने उघडीत दिली तर गर्दीचा उच्चांक होऊ शकतो.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.