देशभर 15 ऑगस्ट रोजी स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करण्यात आला. आणि ऑगस्ट महिन्यातच आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन झाले आहे प्रत्येकाला वाटते आपला बाप्पा आणि आपल्या बाप्पाची आरास सुंदर असावी आणि म्हणूनच बिजगर्णी येथील मोरे कुटुंबियांनी देशप्रेम आणि लाडक्या बाप्पाची आगळीवेगळी सेवा म्हणून सुंदर देखावा साकारला आहे.
बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथे रहाणारे मोरे कुटुंब
दरवर्षी निलेश मोरे व भावंडे यांच्या घरातच बाप्पासाठी आगळीवेगळी सजावट करत असतात. यावर्षी त्यांनी देशाचा 15 ऑगस्ट अमृत महोत्सव चा देखावा साकारला आहे. देखाव्याच्या मधोमध स्थापन केलेली बाप्पाची मूर्ती सर्वांनाच आकर्षित करत आहे.
आझादी का अमृत महोत्सवह देशभर साजरा झाला .यानिमित्त विविध उपक्रम देशभरात राबविले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील हा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात यावा असे आवाहन देशवासियांना केले होते. त्यानुसार बेळगाव शहर परिसरातील विविध संस्था, सरकारी आस्थापना आदींतर्फे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा झाला.
काही ठिकाणी आकर्षक अशी विद्युत रोषणाई करण्यात आली होती, काही ठिकाणी प्रभात फेरीचे आयोजन करण्यात आले. काही ठिकाणी सायकल स्पर्धा, कवायती, तिरंगा फेरी तर् हर घर तिरंगा असे विविध उपक्रम राबवले गेले. सामान्य नागरिकदेखील यात उत्स्फूर्तपणे सहभागी होताना दिसून आले.
त्याचप्रमाणे बेळगाव तालुक्यातील बिजगर्णी येथील मोरे परिवार तर्फे गणरायाच्या सजावट मध्ये देशाचा अमृत महोत्सव अभियान याचा भाग म्हणून उत्कृष्ट व सुंदर आरास साखारली आहे. देखाव्यात देशाचे भाव चित्र रेखाटले असून तिरंगी ध्वज फडकिविण्यात आला आहे. इतकेच नाही तर गणपती बाप्पा च्या डोक्यावर तिरंगी रंगाचा फेटा बांधलेला आहे त्यामुळे सजावटीला विशेष आकर्षण वाटत आहे.