रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम व राजस्थानी युवा मंच, रोट्रॅक्ट क्लब ऑफ वेणुग्राम यांच्या संयुक्त विद्यमाने दांडिया गरबा अर्थात पंखीडा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. दिनांक 30 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबर दरम्यान शगुन गार्डन येथे सायं 7 वाजता सदर पंखीडा 2022 या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. परिपूर्ण असा मनोरंजनाचा खजिना आणि स्पर्धांच्या माध्यमातून बक्षिसांची लय लूट असा चार दिवसीय दांडिया गरबा कार्यक्रम पार पडणार आहे.
सामाजिक हेतू समोर ठेवून सदर पंखीडा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे सदर उपक्रमाच्या माध्यमातून जमा होणारा निधी सामाजिक कार्यक्रमासाठी वापरण्यात येणार आहे. समाजाप्रती आपले कर्तव्य मानत या तिन्ही संस्थांनी हा उपक्रम राबविला आहे. यामुळे उत्सवाबरोबरच सामाजिकता जपावी म्हणूनच सदर उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
बेळगावकरांना बालचमुंपासून महिलांपर्यंत एकत्रितपणे दांडिया गरबा कार्यक्रमाचा आनंद घेता यावा यासाठी सर्वांसाठी म्हणजेच लहान मुले मुली, तरुण-तरुणी,युवक युवती,महिला पुरुष यांच्यासाठी सदर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. चार दिवस आयोजित सदर पंखीडा कार्यक्रमात जल्लोषपूर्ण असा दांडिया गरबा खेळण्याची संधी मिळणार आहे केवळ दोनशे पन्नास रुपये शुल्क दरात सदर फेस्ट मध्ये सहभागी होता येणार आहे.
नाममात्र शुल्क दरात सदर उपक्रमात सहभागी होण्याची संधी यामुळे लाभणार असूn आपण या गरबा दांडियाचा आनंद लुटत असताना आपण दिलेल्या निधी सामाजिक उपक्रमासाठी राबवण्यात येईल हेतू समोर ठेवून अधिकाधिक संख्येने या पंखीडा कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.
पंखीडा कार्यक्रमात उपस्थित होण्यासाठी तसेच अधिक माहितीसाठी पार्थ डी 9480332831 ऋषभ मुंद्रा 7411831104 वृंदा तपाडिया 8095366546 गौरव जे9986902526 यांच्याशी संपर्क साधावा.