अथणी तालुका सरकारी हॉस्पिटलमधून चक्क एक नवजात बालक चोरून लंपास करण्यात आल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे.
अथणी तालुका सरकारी हॉस्पिटलमध्ये ऐनापुर गावातील अंबिका अमित भोवी या महिलेने एका बालकाला जन्म दिला आहे. मात्र अंबिका हिची दिशाभूल करून काल मंगळवारी रात्री अज्ञातांनी तिचे जन्माला आलेले बालक लंपास केले आहे.
अथणी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक शिवशंकर मुकरी यांनी हॉस्पिटलमध्ये घटनास्थळी भेट देऊन माहिती घेण्याबरोबरच तपास कार्य हाती घेतले आहे.
लागला चोरी गेलेल्या बालकाचा तपास
सरकारी इस्पितळातून चोरी झालेल्या नवजात बालकांला केवळ काही तासांत पकडण्याचे काम अथणी पोलिसांनी केले आहे.रात्री 11 वाजता एनापुर येथील महिलेने त्या बालकाला इस्पितळातून पळवून नेल होते अथणी पोलिसांनी सी सी टी व्ही फुटेजच्या माध्यमातून लहान मुलांला सुखरूप त्याच्या आई कडे सोपवण्यात आले. अथणी पोलिसांना पोलीस महासंचालकानी अभिनंदन करत 20 हजारांचे बक्षीस जाहीर केलं आहे.