मूळ नक्षत्राच्या निमित्ताने सहाव्या दिवशी घरगुती गणपतीचे विसर्जन होत असताना जक्कीन होंड परिसरात अनेक गणेश भक्त घरगुती गणपतीचे विसर्जन करत होते त्यावेळी अचानक तिथला लाईटचा पुरवठा बंद होऊन परिसर अंधारात गडप झाला होता
त्यावेळी श्री राम सेना हिंदुस्थान आणि मध्यवर्ती गणेश महामंडळाचे अध्यक्ष रमाकांत कोंडुसकर यांनी त्वरित तिथे धाव घेतली कर्मचाऱ्यांना प्राचारण करत तो वीज पुरवठा सुरळीत करून गणेश भक्तांना दिलासा दिला.
अंधार मय परिस्थिती पाहून लागलीच कोंडुस्कर यांनी हेस्कॉम अधिकाऱ्यांना दूरध्वनी वरून संपर्क साधला त्वरित विद्युत पुरवठा सुरु करण्याची विनंती करत स्वता थांबून काम करवून घेतले.
गणेश महामंडळाच्या अध्यक्षांच्या कडून ज्या पद्धतीच्या कामाची गणेश भक्ताकडून अपेक्षा असते त्या पद्धतीचे काम रमाकांत कोंडुस्कर यांच्याकडून त्वरित झाल्यामुळे नागरिकात एक प्रकारचे समाधान पसरले होते. रमाकांत कोंडस्करांच्या या कार्याचे लोकांनी कौतुक केले आणि एकंदर गणेशोत्सव काळात हेस्कॉमने योग्य नियोजन करावे आणि कोणत्याही अनुचित प्रकार न घडावेत यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवावा अशी मागणी नागरिकांत होत आहे.
मध्यवर्ती गणेश महामंडळाच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबवले गेले आणि ही कार्य तत्परता ज्या पद्धतीने अपेक्षित असते तशा पद्धतीचे गणेश महामंडळ का कार्य करत आहे याबद्दलही लोकांनी कौतुक म्हणून या घटनेकडे बघितलं.