मुतगा (ता. जि. बेळगाव) येथील शेतकरी नागापा बाळू चौगुले यांचा बैल रविवारी सकाळी लंपी स्कीन रोगामुळे दगावला. यामुळे चौगुले यांचे मोठे नुकसान झाले आहे.
मुतगा येथील शेतकरी नागापा बाळू यांनी गेल्याच वर्षी 1 लाख रुपये खर्च करून रायबाग येथून उमदी बैलजोडी खरेदी करून आणली होती. यापैकी एक बैल आज सकाळी लंपी स्कीनमुळे मृत्युमुखी पडला.
सध्या बेळगाव तालुक्याच्या पूर्व भागात विशेष करून सांबरा भागात लंपी स्कीम रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. या रोगामुळे गेल्याच शनिवारी सांबरा येथे देखील एक बैल दगावला होता. आता आज सकाळी नागाप्पा चौगुले यांचा बैल मृत्यू पावला. या पद्धतीने लंपी स्कीम रोगाची लागण होऊन मुतगा येथील 14 जनावरे आतापर्यंत दगावली आहेत.
त्यामुळे गावातील पशुपालकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. तरी पशु संगोपन खात्याने याची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी.
तसेच सरकारने सदर रोगामुळे मृत्यूमुखी पडलेल्या जनावरांच्या मालकांना तात्काळ योग्य नुकसान भरपाई अदा करून दिलासा द्यावा, अशी जोरदार मागणी केली जात आहे.