Thursday, December 26, 2024

/

आय एन एस विक्रांताच्या बांधणीत बेळगावचे योगदान

 belgaum

बेळगाव लाईव्ह : प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा ठसा आणि बहुमोल योगदान देणाऱ्या बेळगावच्या शिरपेचात आणखी एक मनाचा तुरा रोवला गेला आहे. भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका असणाऱ्या ‘आयएनएस विक्रांत’ हि युद्धनौका भारतीय नौदलात सामील झाली असून या युद्धनौकेसाठी बेळगावच्या युवकांचेही योगदान महत्वपूर्ण ठरले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोची येथून भारतीय बनावटीची विमानवाहू युद्धनौका आयएनएस विक्रांत हि नौदलात सामील केली. त्यामुळे आजचा दिवस हा भारतीय नौदलासाठी महत्त्वाचा दिवस आहे. कारण ज्या नौकेला तयार होण्यास तब्बल १३ वर्षे लागली, अशी आयएनएस विक्रांत आज भारतीय नौदलात सामिल झाली आहे. हि बाब जितकी प्रत्येक भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे तितकीच ती प्रत्येक बेळगावकरांसाठी सुद्धा अभिमानास्पद ठरली आहे.

बेळगाव परिसरात संरक्षण खात्याची अनेक कार्यालये आहेत. मराठा लाईट इन्फन्ट्री, ज्युनियर लीडर्स विंग, सांबरा वैमानिक प्रशिक्षक केंद्र, खानापूर येथील तोराळी येथील सीआरपीएफ प्रशिक्षण केंद्र, हालभावी येथील आयटीबीपी प्रशिक्षण केंद्र अशी अनेक विभागातील प्रशिक्षण केंद्र बेळगावमध्ये आहेत. मात्र नौदलाच्या प्रशिक्षणासाठी कोणतेही प्रशिक्षण केंद्र बेळगावमध्ये नाही. परंतु तरीही बेळगावच्या युवकांनी नौदल क्षेत्रात आपले योगदान देत बेळगावचा ठसा उमटविला आहे.Ins vikrant

आयएनएस विक्रांत या विमानवाहू युद्धनौकेत जर्मन बेस अद्ययावत व्यवस्था बसविण्याच्या कामात बेळगावच्या तरुणांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. या नौकेत बसविण्यात आलेली रिमोट कंट्रोल सिस्टम हि जर्मनीची असून ती सिस्टम दाखल झाल्यानंतर पूर्णपणे ती सिस्टम इंस्टाल करून ट्रायल घेण्यासाठी बेळगावच्या कंपनीची निवड करण्यात आली.Ins vikrant

सदर इंस्टॉलिंग आणि ट्रेनिंग बेळगावच्या वाघवडे येथील एका कंपनीतील अभियंत्यांनी केले असून विशेषतः समुद्रात कोचीन येथील नौदलाच्या केंद्रात हे सर्व काम झाले आहे.

बेळगावमधील मच्छे येथील विराज टेक्नोक्रॅट्स नावाच्या फर्मने हे काम केले आहे. या कंपनीचे मालक रुपेश गोडसे आणि सोबत त्यांचे सहकारी किशोर बस्तवाडकर, निरंजन आणवेकर, राहुल बस्तवाडकर यांनी हे योगदान दिले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.