बेळगाव शहरातील विसर्जन मिरवणूकीवर 20 ड्रोन आणि 700 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची अश्या एकूण 720 हुन अधिक तिसऱ्या डोळ्यांची नजर असणार आहे.पोलिसांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
बेळगावचा गणेश उत्सव आणि शिवजयंती मिरवणूक व्यवस्थित पार पाडावी हे बेळगाव पोलिसांसमोर मोठे आव्हान असते कारण पुणे बंगळुरू नंतर देशात कर्नाटकात बेळगावात फार मोठ्या प्रमाणात विसर्जन मिरवणूक काढली जाते. बेळगाव शहराची विसर्जन मिरवणूक 20 तासाहून अधिक काळ चालते.
बेळगावात जवळपास चार हजार पोलिसांचा बंदोबस्त या विसर्जन मिरवणुकीसाठी तैनात करण्यात आला आहे त्या पोलीस बंदोबस्ताची तपशील खालील प्रमाणे आहे.
7 एस पी 28 डी एस पी,68 पोलीस निरीक्षक,104 पी एस आय,164 ए एस आय,3000 पोलीस कर्मचारी, के एस आर पी 10 तर सी ए आर 7 तुकड्या रॅपिड ऍक्शन फोर्सची 1 बटालियन,20 ड्रोन कॅमेरे प्रमुख 700 ठिकाणी cctv कॅमेरे,100 सेंट्री असा मोठा पोलीस बंदोबस्त शुक्रवारी गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी असणार आहे.
गुरुवारी दुपारी पोलीस आयुक्त बोर्लिंगय्या यांनी पोलिसांना बंदोबस्तासाठी मार्गदर्शन केलं तर सायंकाळी शहरात पुन्हा एकदा रूट मार्च करण्यात आला.रात्री पोलीस गाड्यांच्या ताफ्यासह मिरवणूक मार्गावर मॉक ट्रायल घेण्यात आला.
बेळगाव शहर आणि तालुक्यातील दारू दुकाने देखील बंद असणार असून शुक्रवारी आणि शनिवारी दारू दुकाने आणि रेस्टॉरंट मधून दारू विक्री बंदीचा आदेश बजावण्यात आला आहे.