बेळगाव बागलकोट रोडवर कार दुचाकी आणि लॉरी मध्ये झालेल्या भीषण अपघातात ए एस आय पत्नी मुलगी सह चार जण ठार दोघे जखमी झाले आहेत. रविवारी बेळगाव बागलकोट रोडवर सौन्दत्ती तालुक्यातील बुदीकोप्प गावाजवळ ही घटना घडली आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे
लोकापूर हुन गोव्याकडे निघालेल्या सिमेंट भरलेल्या लॉरीने बेळगावहुन लोकापूर कडे निघालेल्या कारला दुचाकीला धडक दिली त्यात हा अपघात घडला आहे.कारमध्ये पाच तर दुचाकीवरून तीन जण प्रवास करत होते अशी माहिती मिळाली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अपघातात कार चालक निखिल कदम वय 24 रा.बेळगाव,कुडची पोलीस स्थानकाचे ए एस आय वाय एम हलकी यांची पत्नी रेणुका हलकी वय 48 यांचा जागीच मृत्यू झाला तर अक्षता हलकी वय 22(ए एस आय यांची मुलगी) आणि दुचाकीवर मागे बसलेली आजी हनमव्वा वय 66 यांचा मृत्यू इस्पितळात नेताना झाला.
कार मध्ये बसलेले तिघे तर एक दुचाकीवर मागे बसलेल्या चा मृत्यू झाला आहे.अपघात इतका भीषण होता की कारचा चेंदामेंदा झाला होता घटनास्थळी बघ्यांनी गर्दी केली होती कार क्रेन द्वारे बाजूला काढण्यात आली.
मुरगोड पोलिस स्थानक व्याप्तीत ही घटना घडली असून पोलीस अधीक्षक संजीव पाटील,अतिरिक्त पोलीस अधीक्षक महानिंग नंदगावी यांनी घटनास्थळी भेट देऊन पहाणी केली.