लघुउद्योजकांना चालना देण्याच्या उद्देशाने हुबळी येथील देशपांडे फाउंडेशनच्या माध्यमातून सलग चौथ्यांदा बेळगाव येथे प्रदर्शन व विक्री केंद्र भरविण्यात आले आहे.
महावीर भवन येथे सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ शुक्रवारी दीपप्रज्वलनाने पार पडला.साधारण 40 स्टॉलच्या माध्यमातून विविध लघुउद्योजकांनी साकारलेल्या वस्तूंचे प्रदर्शन त्या ठिकाणी भरविण्यात आले आहे.
दसरा स्पेशल उद्यमी संथे या नावाने प्रदर्शन भरविण्यात आले आहे. हस्तकला गृह सजावट पोशाख बॅग्स ॲक्सेसरीज खाद्यपदार्थ आणि बरेच काही असे एकंदरीत 40 स्टॉल त्याठिकाणी साकारण्यात आले आहेत.
लघु उद्योजकांना चालना देण्याबरोबर एकाच ठिकाणी या वस्तू उपलब्ध व्हाव्यात यासाठी बेळगाव मध्ये चौथ्यांदा प्रदर्शन भरविण्यात आले आहे. नाविन्यपूर्ण आणि वैविध्यपूर्ण वस्तू हे या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे.
शुक्रवारी सदर प्रदर्शनाचा उद्घाटन समारंभ पार पडला असून सलग चार दिवस म्हणजेच सोमवारी सोमवार पर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे दररोज सकाळी दहा तीस ते रात्री नऊ या वेळेत महावीर भवन खानापूर रोड येथे प्रदर्शन व विक्री सुरू राहणार आहे यामुळे दस्रोत्सवाच्या निमित्ताने वैविध्यपूर्ण वस्तू व साहित्य खरेदीसाठी देशपांडे फाउंडेशन ने आयोजित केलेले प्रदर्शन नक्कीच बेळगावकरांसाठी लाभदायक ठरणार आहे.