बेळगाव गोल्फ कोर्स मैदान परिसरातील बिबट्याची शोध मोहीम वनखात्याने आवरती घेतल्यामुळे या मोहिमेसाठी मागविलेल्या दोन्ही प्रशिक्षित हत्तींना आज पुन्हा माघारी त्यांच्या मूळ जागी धाडण्यात आले.
गेल्या महिन्याभरापासून गुंगारा देत असलेल्या बिबट्याचा शोध घेण्यासाठी बोला आणि पोलीस खात्यातर्फे काल रविवारी गोल्फ कोर्स मैदान परिसरात सुमारे 250 हून अधिक कर्मचाऱ्यांसह संयुक्त मोहीम राबवून बिबट्याला शोधण्याचा अखेरचा प्रयत्न करण्यात आला.
मात्र बिबट्या कोठेच आढळून आला नसल्यामुळे तो नैसर्गिक अधिवासा परतल्याचा अंदाज बांधून वनखात्याने आज सोमवारपासून बिबट्याची शोध मोहीम थांबविली आहे. परिणामी या शोध मोहिमेसाठी सकरिबेले शिमोगा येथून मागविण्यात आलेले दोन हत्ती पुन्हा माघारी त्यांच्या मूळ जागी पाठवण्यात आले आहेत.
अर्जुन व आले या दोन्ही प्रशिक्षित हत्तींना मोठ्या दहा चाकी लोरी मधून सकरिबेले येथे रवाना करण्यात आले.
दरम्यान सोमवार पासून गोल्फ कोर्स जंगल परिसरातील त्या 22 शाळांना सुरुवात झाली आहे रविवारीच जंगलातील बिबट्या शोध मोहिमेचा शेवट करण्यात आला होता. दोन हत्ती सह गेल्या एक महिन्यापासून बिबट्याला जेरबंद करण्याच्या मोहिमेला वन खात्याने जवळपास 50 लाख रुपये खर्च केले आहेत मात्र अद्याप बिबट्या वन खात्याच्या पिंजऱ्यात अडकला नव्हता.
शेवटी वन खात्याने गोल्फ कोर्स मधील वास्तव्यास असलेला बिबट्या जंगलात गेलावा असावा असे गृहीत धरून शोध मोहीम थांबवली आहे त्यानुसार हत्ती देखील आपल्या स्वगृहीमुळे रवाना झाले आहेत.