दसरा सुट्टी बाबतचा संभ्रम दूर करताना बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दसरा सुट्टी येत्या सोमवार दि. 3 ते रविवार दि. 16 ऑक्टोबरपर्यंत असेल, असे शिक्षण खात्याने स्पष्ट केले आहे.
शिक्षण खात्याने मंगळूर व म्हैसूर या जिल्ह्यांमध्ये दसऱ्याच्या काळात सुट्टी जाहीर केली आहे. उर्वरित जिल्ह्यात तेथील जिल्हाधिकारी व जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दसरा सुट्टी बाबत निर्णय घ्यावा अशी सूचना करण्यात आली होती.
त्यामुळे या सुट्टीत बदल होण्याची चर्चा शिक्षकांमध्ये रंगली होती. सोशल मीडियावर देखील दसरा सुट्टीत बदल होणार असल्याचे संदेश फिरवले जात होते. त्यामुळे दसरा सुट्टी बाबत संभ्रम निर्माण झाला होता.
आता बेळगाव शैक्षणिक जिल्ह्यात दसरा सुट्टी येत्या 3 ते 16 ऑक्टोबरपर्यंत असणार असल्याचे शिक्षण खात्याने स्पष्ट केल्यामुळे हा संभ्रम दूर झाला आहे. शिक्षक संघटना आणि पालकांनी देखील सदर कालावधीमध्येच दसरा सणाच्या काळात मुलांना सुट्टी दिली जावी, अशी मागणी केली होती.