बेळगावमध्ये २०२० साली पिरनवाडी येथील चौकावरून वाद होऊन तणाव निर्माण झाला होता. या भागात असलेली छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांच्या मूर्तीची 2001 साली प्रतिष्ठापना केली. त्यावेळी मूर्ती उभारण्यासंबंधी ग्रामपंचायतीमध्ये ठराव संमत केला. मात्र, त्याच जागेत काही जण क्रांतिवीर संगोळी रायण्णा यांचा पुतळा बसविण्याचे कारस्थान करण्यात दंग होते. याचदरम्यान या भागात २०२० साली तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली. यावेळी एडीजीपी अमरकुमार पांडे यांनी मध्यस्थी करून सदर तणाव निवळला होता.
ज्यावेळी एडीजीपींनी मध्यस्थी करून सर्वांची समजूत काढली त्यावेळी मराठी भाषिकांनी आपली बाजू स्पष्टपणे मांडली. आपला क्रांतिवीर संगोळी रायन्ना यांच्या पुतळ्याला विरोध नाही मात्र ज्याठिकाणी छत्रपती शिवरायांची मूर्ती आहे त्याठिकाणी पुतळा उभारण्यात येऊ नये हि भूमिका मराठी भाषिकांनी मांडली होती.मात्र याप्रकरणी पिरनवाडी येथील ९ युवकांना नोटिसी बजावण्यात आल्या असून आतापर्यंत १३ वेळा पाठविलेल्या नोटिसीला उत्तर न दिल्याने वॉरंट बजावण्यात येत असल्याचे या नोटिसीत म्हटले आहे.
सदर युवकांना आजपर्यंत एकही नोटीस मिळाली नसून नेहमीप्रमाणे कर्नाटक सरकारचे मराठी युवकांना लक्ष्य करण्याचे हे कारस्थान असल्याचे स्पष्ट होत आहे. याप्रकरणी ऍडव्होकेट महेश बिर्जे यांच्याशी चर्चा करून पुढील निर्णय घेण्यात येणार आहे.
अमरकुमार पांडे यांनी याप्रकरणी मध्यस्थी करत या चौकाला छत्रपती शिवरायांचे नाव द्यावे परंतु मूर्ती संगोळी रायन्ना यांची बसवावी अशी समजूत काढून तत्कालीन परिस्थिती हाताळली होती. मात्र मराठी तरुणांवर कायम वक्रदृष्टी ठेवणाऱ्या कर्नाटक सरकारने मात्र त्या घटनेला नेहमीप्रमाणे मराठी भाषिकांनाच दोषी ठरवत नोटीस पाठविल्या आहेत.