व्यवसायिक अवजड वाहनांना चोर्ला घाटातून प्रवेश बंद करून टीकेचे धनी ठरलेल्या गोवा सरकारने अखेर बेळगाव लॉरी असोसिएशनच्या मागणीची दखल घेत अवजड वाहनांच्या प्रवेश बंदीचा तो आदेश मागे घेतला आहे.
बेळगावहुन चोर्ला मार्गे दररोज शेकडो वाहने गोव्याच्या हद्दीत प्रवेश करत असतात मात्र गोवा उत्तर विभागाच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अवजड वाहनांना बंदीचा आदेश बजावला होता त्यानुसार शेकडो वाहनांना केरी चेक पोस्ट जवळ अडवून ठेवण्यात आले होते त्यावर गोवा सरकारच्या आदेशा विरोधात बेळगावात निदर्शन झाली होती.
लॉरी मालक असोसिएशनने बेळगावचे जिल्हाधिकारी डॉ नितेश पाटील यांची आणि पोलीस आयुक्त डॉ बोर्लिंगय्या यांची भेट घेऊन अवजड वाहन प्रवेश बंदीचा आदेश मागे घेण्याची विनंती केली होती.
बेळगावच्याअधिकाऱ्यांनी विशेष प्रयत्न करत सदर व्यावसायिक अवजड वाहने बंदीचा आदेश मागे घेण्याची विनंती गोवा सरकारकडे केली होती त्यानुसार गोवा सरकारने रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत व्यावसायिक अवजड वाहनांना प्रवेश देण्यास मुभा दिली आहे.
गोवा सरकारच्या नवीन आदेशानुसार चोरला रोड वरून रात्री दहा ते पहाटे पाच या वेळेत आता व्यावसायिक अवजड वाहने प्रवेश करू शकतात.