६ सप्टेंबर रोजी मिळालेल्या माहितीनुसार ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सीसीबी पोलीस इन्स्पेक्टर निंगनगौड पाटील यांच्या नेतृत्वाखालील पथकाने बेळगाव तालुक्यातील बादरवाडी येथील रहिवासी लक्ष्मण (उर्फ बाळ्या) सातेरी पाटील या आरोपीकडून गोव्याहून बेकायदेशीर रित्या आणण्यात येत असलेल्या दारूची जप्ती केली आहे.
कर्ले येथील कारच्या डिक्कीमधून गोव्यातून दारू आणून आपल्या मुलाच्या माध्यमातून कर्ले गावात या दारूची विक्री करण्यात येत असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
साहिल लक्ष्मण पाटील (वय १९, रा. बादरवाडी,) तसेच आणखी एका बालकाकडून गोवा बनावटीच्या १८९ सरासरी बाटल्या (सरासरी १०८ लिटर) इतका मद्यसाठा, याचप्रमाणे KA-04/AB-2166 क्रमांकाची टोयोटा इटियॉस कार, १ मफेड बाईक जप्त करण्यात आली आहे.
लक्ष्मण सातेरी पाटील या इसमाने बेकायदेशीर रित्या गोव्यातून गोवा बनावटीची दारू आणून स्वतःच्या मुलाच्या मार्फत चढ्या दराने विक्री करण्यात येत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात सदर प्रकरण दाखल करण्यात आले असून पोलीस पुढील तपस करत आहेत.
या कारवाईत पोलीस इन्स्पेक्टर निंगनगौड पाटील, पोलीस कर्मचारी एच एस निसन्नवर, एस बी पाटील, एम एम वडेयार, एस एम भजंत्री, वाय डी नदाफ आदींनी सहभाग घेतला होता. या पथकाने केलेल्या कारवाईचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडून कौतुक होत आहे.