आगामी विधानसभा निवडणुकीसाठी बेळगाव उत्तर मतदार संघाच्या उमेदवारीत कोणताही बदल होणार नाही, असे स्पष्टीकरण कर्नाटक प्रदेश राज्याध्यक्ष नलीनकुमार कटील यांनी आज दिले.
शहरात नलीनकुमार कटील आज गुरुवारी पत्रकारांशी बोलत होते. विधानसभा निवडणुकीच्या तिकिटासाठी बेळगाव उत्तर मतदारसंघात इच्छुकांची भाऊगर्दी झाली आहे, याकडे पत्रकारांनी लक्ष वेधले असता इच्छुकांची संख्या वाढली यात आनंदच मानला पाहिजे.
इच्छुकांची संख्या वाढणे म्हणजे पक्ष संघटना मजबूत झाल्याची पोचपावती आहे. तसेच अनेक जण नेतृत्व करण्यास इच्छुक आहेत हे यावरून स्पष्ट होते असे सांगून एखादी समस्या अथवा कारण असेल तरच विद्यमान आमदारांच्या जागी नव्या चेहऱ्याला संधी देण्याबाबत विचार केला जाईल. मात्र सध्या तरी तसा कोणताही विचार केला जात नसल्याचे नलीनकुमार कटील यांनी स्पष्ट केले.
गेल्या कांही दिवसांपूर्वी भाजप महानगरचे अध्यक्षपद आमदार ॲड. अनिल बेनके यांना देण्यात आल्यानंतर आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांची उमेदवारी डावलण्यासाठी ही कृती करण्यात आल्याची चर्चा बेळगाव उत्तर मतदारसंघांमध्ये होती. आमदार बेनके यांना महानगर अध्यक्षपद दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीचे तिकीट मिळावे यासाठी अनेक इच्छुकांनी भाऊगर्दी केली आहे.
अनेक जण निवडणुक लढविण्याच्या तयारीला लागले आहेत. त्या अनुषंगाने पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देताना उमेदवारीत कोणताही बदल करण्यात येणार नसल्याचे स्पष्ट करून बेळगाव उत्तर मतदारसंघात इच्छुकांची संख्या वाढली याचा अर्थ पक्ष तितका बळकट झाला असे बेरजेचे गणित आम्ही राजकारणात गृहीत धरतो, असे कटिल यांनी नमूद केले.
नेमकं काय म्हणाले कर्नाटक प्रदेश भाजप अध्यक्ष नळीन कुमार कटील पहा खालील व्हीडिओ
उत्तरचे आमदार अनिल बेनके यांचे तिकीट कापणार नाही-भाजप प्रदेशाध्यक्ष नळीन कुमार कटील@nalinkateel @CTRavi_BJP @BJP4Karnataka pic.twitter.com/1I9s8pwsxv
— Belgaumlive (@belgaumlive) September 29, 2022