Thursday, December 26, 2024

/

बेळगावला वेध नवरात्र उत्सवाचे

 belgaum

गणेशोत्सव नुकताच संपन्न झाला असून आता सप्टेंबर अखेरीला येऊ घातलेल्या नवरात्र उत्सवाचे वेध लागले आहेत .त्या दृष्टिकोनातून तयारी सुरू असून दौड आणि आता दांडियाचा रास रंगणार आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात हा उत्सव करता न आल्याने उत्साहाला मुरड घालावी लागली होती. मात्र यंदा हा उत्सव मोठ्या प्रमाणात होणार असून याच पार्श्वभूमीवर विविध सार्वजनिक मंडळातर्फे मोठा उत्साह दिसून येत आहे.

यंदा नवरात्र उत्सवाला २६ सप्टेंबर अर्थात घटस्थापनेपासून सुरुवात होणार आहे. हा उत्सव दिनांक 4 ऑक्टोबर पर्यंत चालणार असून 5 रोजी विजयादशमी आहे.या काळात विविध मंडळे दुर्गामाता ची प्रतिष्ठा करून विविध कार्यक्रमांचे आयोजन करतात त्यानुसार सार्वजनिक मंडळांनी पूर्वतयारीसाठी बैठका आयोजित करून उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा याची तयारी चालवली असल्याचे दिसून येत आहे.बेळगाव शहरात बहुतांश सर्वच मंदिरातून नवरात्रोत्सव उत्साहात साजरा केला जातो.

किल्ला दुर्गादेवी मंदिर,श्रीजती मठ दुर्गादेवी मंदिर, शहापूर अंबाबाई मंदिर, कांगली गल्ली एकता युवक मंडळाचा नवरात्रोत्सव,हिंदवाडी श्री महालक्ष्मी मंदिर,तानाजी गल्ली श्री रेणुका देवी मंदिर, बसवन गल्ली श्री महालक्ष्मी मंदिर अशा विविध मंदिरात नवरात्रोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो.

Doud 2019
File pic doud year 2019

सध्या कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यामुळे गणेशोत्सव देखील मोठ्या थाटामाटात संपन्न झाला होता. ढोल ताशांचे आवाज घुमून हा उत्साह गणरायाच्या मिरवणुकीने मोठ्या उत्साहात साजरा झाला होता.मात्र दौड व दांडीयांचा रास रंगणार असून या दृष्टिकोनातून गल्लोगल्ली पूर्वतयारी केली जात आहे.मंडळाच्या वतीने हा उत्सव नऊ दिवस उत्साहात साजरा केला जातो.

या काळात विविध सामाजिक उपक्रम राबवण्याबरोबर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले जाते याबरोबरच विशेष करून दांडिया देखील आयोजित केल्या जातात लहान मुले मुली तसेच विविध संस्था, संघ यामध्ये दांडीयांचा खेळ खेळण्यासाठी सहभागी होतात. याच पार्श्वभूमीवर आता बाजारपेठ देखील बहरल्या असून दांडिया विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे चित्र दिसून येऊ लागले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.