Friday, January 31, 2025

/

काँग्रेस विरोधात सोशल मीडियावर मोहीम

 belgaum

आगामी विधानसभा निवडणूक 6 महिन्यांवर येऊन ठेपलेली असताना प्रत्येक पक्षावर सोशल मीडियाच्या माध्यमातून हळूहळू वार सुरू झाले आहेत. त्याच्याच एक भाग म्हणून काँग्रेस संबंधी एक संदेश व्हायरल झाला आहे. मागील विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेसकडून चार मतदारसंघात एकही मराठी उमेदवार देण्यात आला नव्हता. आता पुन्हा त्याची पुनरावृत्ती झाल्यास काँग्रेसला धडा शिकवा. काँग्रेसला मराठी माणसाने मतदान करू नये, असे आवाहन या संदेशाद्वारे करण्यात आले आहे.

मागील विधानसभेमध्ये युवराज कदम, रमेश गोरल यासारख्या धडाडीच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना संधी देण्याची जोरदार मागणी करण्यात आली होती. मात्र त्यांना ती संधी देण्यात आली नाही. यावेळी देखील तीच परिस्थिती उद्भवल्यास काँग्रेसला चांगला धडा शिकवा.

येत्या निवडणुकीमध्ये जर चारही मतदारसंघातून काँग्रेस मराठी उमेदवार देणार नसेल तर काँग्रेसवर सामूहिक बहिष्कार घाला. जागरूक राहा, शहाणे व्हा, सतर्क व्हा आणि काँग्रेसला धडा शिकवा, असे या संदेशातून स्पष्ट करण्यात आले आहे. मुळातच काँग्रेसकडे मराठी माणसांची कमी होट बँक अर्थात कमी मताधिक्य आहे. या परिस्थितीत सोशल मीडियावर या पद्धतीने काँग्रेस विरोधात संदेश व्हायरल झाल्यामुळे आगामी काळात त्याचा काय परिणाम होतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

 belgaum

सध्या बेळगाव ग्रामीण आणि खानापूर तालुका अशा दोन ठिकाणी काँग्रेसचे आमदार असून बेळगाव उत्तर आणि दक्षिण मतदार संघ भाजपाकडे आहे. त्याचप्रमाणे यमकनमर्डी मतदारसंघ अनुसूचित जमातीसाठी राखीव (एसटी) असेपर्यंत तो काँग्रेसच्या ताब्यात आहे. सध्याच्या विद्यमान काँग्रेस आमदारांमध्ये खानापूरच्या आमदार डाॅ. अंजलीताई निंबाळकर वगळता एकही आमदार मराठी नाही.

त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये मराठी चेहऱ्यांना संधी मिळावी यासाठीच सोशल मीडियावरील हा संदेशाचा खटाटोप असू शकतो, असा कयास राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.