मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटरतर्फे सेंटरच्या युनिट हेडकॉर्टर कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा येत्या सोमवार दि. 19 ते सोमवार दि. 26 सप्टेंबर 2022 या कालावधीत शिवाजी स्टेडियम एमएलआयआरसी बेळगाव येथे आयोजित करण्यात आला आहे.
सदर युनिट हेडकॉटर्स कोटा अग्नीवीर भरती मेळाव्याचे वेळापत्रक पुढील प्रमाणे आहे. 19 सप्टेंबर : जनरल ड्युटी पद फक्त उत्कृष्ट खेळाडूंसाठी (अखिल भारतीय पातळीवरील सर्व जातींसाठी) स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी). 20 सप्टेंबर : अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्राकरिता (अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव, जालना, कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपशहरी भाग).
21 सप्टेंबर : अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त महाराष्ट्र करिता (नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ) स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी). 22 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी मध्यप्रदेश, छत्तीसगड, गुजरात आणि गोवा राज्यांकरिता स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी). 23 सप्टेंबर : अग्निवीर जनरल ड्युटी पदासाठी फक्त कर्नाटक व आंध्र प्रदेश करिता स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी).
24 सप्टेंबर : अग्नीवीर ट्रेड्समन पदासाठी अ. भा. सर्व जातींकरिता (फक्त लष्करात सेवा बजावणाऱ्या तसेच माजी सैनिकांसाठी) स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी), 26 सप्टेंबर अग्नीवीर क्लार्क / स्टोरकीपर टेक्निकल पदाकरिता अ. भा. सर्व वर्गांसाठी (एआयएसी)( फक्त एमएलआयआरसीमध्ये सेवा बजणाऱ्या आणि निवृत्त झालेल्यांसाठी) स्क्रीनिंग अर्थात शारीरिक क्षमता आणि मोजमाप तपासणी (पीएफटी). उपरोक्त सर्व पदांसाठीची लेखी परीक्षा (सामान्य प्रवेश परीक्षा) येत्या नोव्हेंबर 2022 मध्ये घेतली जाणार आहे.
सदर भरती मेळाव्यासाठी उमेदवाराचे वय 1 ऑक्टोबर 2022 रोजी पुढील प्रमाणे असले पाहिजे. अग्निवीर जीडी, अग्निवीर ट्रेड्समन, अग्निवीर क्लार्क /एसकेटी पदासाठी उमेदवाराची वयोमर्यादा 17 वर्षे 6 महिने ते 23 वर्ष (जन्म 1 ऑक्टोबर 1999 पूर्वी अथवा 1 एप्रिल 2005 नंतर झालेला नसावा) इतकी असणे आवश्यक आहे. शैक्षणिक पात्रता अग्नीवीर जनरल ड्युटी पदासाठी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण मिळवून किमान 45 टक्क्यांसह 10 वी उत्तीर्ण आवश्यक. वाहन चालक पदासाठी हलका वाहन (एलएमव्ही) चालक परवाना असलेल्यांना प्राधान्य.
अग्निवीर क्लार्क स्टोअरकिपर टेक्निकल पदासाठी कोणत्याही शाखेतून 12 वी परीक्षा प्रत्येक विषयात 50 टक्के गुणासह एकूण 60 टक्के गुणांनी उत्तीर्ण. अग्निवीर ट्रेडर्समन पदासाठी फक्त 10 वी उत्तीर्ण पुरेसे असले तरी प्रत्येक विषयात 33 टक्के गुण असले पाहिजेत. खेळाडूंकडे विद्यापीठ, जिल्हा, राज्य, राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावरील उल्लेखनीय कामगिरीची प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.