Sunday, December 29, 2024

/

24 रोजी चव्हाट गल्लीत सर्वपक्षीय शोकसभा

 belgaum

सीमा सत्याग्रही आणि ज्येष्ठ कामगार नेते ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांच्या निधनाबद्दल येत्या शनिवार दि. 24 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता सर्वपक्षीय शोक सभेचे आयोजन करण्यात आले आहे. चव्हाट गल्ली बेळगाव येथील श्री जालगार मारुती मंदिर येथे ही सभा होणार आहे.

मराठा जागृती संघाची ॲड. येळ्ळूरकर यांना श्रद्धांजली

बेळगाव शहरातील मराठा जागृती संघातर्फे सीमा सत्याग्रही ज्येष्ठ वकील व मराठा समाजाचे तडफदार नेते दिवंगत ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांना नुकतीच श्रद्धांजली वाहण्यात आली.

मराठा जागृती संघाच्या कार्यालयामध्ये काल बुधवारी संघाचे अध्यक्ष गोपाळराव बिर्जे यांच्या अध्यक्षतेखाली शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिवंगत ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांना दोन मिनिटे स्तब्धता पाडून श्रद्धांजली वाहण्यात आली. गोपाळराव बिर्जे यांनी यावेळी बोलताना ॲड. येळ्ळूरकर यांच्या कार्याचा गौरव केला.

आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात बिर्जे यांनी आठवणींना उजाळा देताना एप्रिल 1975 मध्ये सीमाप्रश्नी तत्कालीन नेते बाबुराव ठाकूर, बळवंतराव सायनाक, प्रभाकरराव पावशे व ॲड. किसनराव येळ्ळूरकर यांच्या नेतृत्वाखाली दिल्लीला काढलेल्या मोर्चाची माहिती दिली. त्यावेळी प्रथम आपल्याला ॲड. येळ्ळूरकर यांचे खंबीर नेतृत्व जवळून पाहण्याची संधी मिळाली. तेंव्हापासून त्यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभत आहे. गेल्या 2010 मध्ये मी सेवानिवृत्त झालो, तेव्हा माझ्या सेवानिवृत्ती कार्यक्रमाला ॲड. येळ्ळूरकर हेच प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते असे सांगून त्यांच्या निधनामुळे एक अभ्यासू जाणकार आणि मराठा समाजावर अफाट प्रेम करणारे व्यक्तिमत्व हरपले आहे, असे मनोगत बिर्जे यांनी व्यक्त केले. शोकसभेस मराठा जागृती संघाच्या पदाधिकारी, सदस्यांसह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.Kisan yellurkar

बार असो.च्या शोकसभेत मान्यवरांना श्रद्धांजली

बेळगाव बार असोसिएशनतर्फे आज दुपारी आयोजित शोक सभेमध्ये मंत्री कै. उमेश कत्ती आणि असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ॲड. कै. किसनराव येळ्ळूरकर या मान्यवरांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

बेळगाव बार असोसिएशनतर्फे अध्यक्ष ॲड. प्रभू यतनट्टी यांच्या अध्यक्षतेखाली न्यायालय आवारातील टीव्ही हॉलमध्ये आज गुरुवारी दुपारी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. सदर शोकसभेमध्ये गेल्या 6 सप्टेंबर रोजी निधन पावलेले अन्न व नागरी पुरवठा खात्याचे मंत्री उमेश कत्ती यांच्यासह असोसिएशनचे माजी उपाध्यक्ष ज्येष्ठ वकील ॲड. किसनराव येळ्ळूरकर तसेच अलीकडे निधन पावलेल्या वकिलांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी बार असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह उपस्थित यांची निधन पावलेल्या व्यक्तींच्या कार्याचा गौरव करणारी भाषणे झाली.

याप्रसंगी असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲड. सचिन शिवन्नावर, ॲड. सुधीर चव्हाण, सरचिटणीस ॲड. गिरीराज पाटील, ॲड. बंटी कपाई, ॲड. महांतेश पाटील, ॲड. अभिषेक उदोशी, ॲड. आदर्श पाटील, ॲड. इरफान ब्याल, ॲड. प्रभाकर पवार, ॲड. पूजा पाटील, ॲड. मारुती कामान्नाचे आदींसह बहुसंख्य वकील उपस्थित होते.

 belgaum

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

This site uses Akismet to reduce spam. Learn how your comment data is processed.