बेळगाव जिल्ह्यात मानव वस्त्यांकडे वन्य प्राण्यांचा वावर वाढला आहे जिल्ह्यात मागील पंधराव्यापासून बिबट्या हरीण तरच अशा प्राण्यांनी प्राण्यांचे आगमन झाल्याचे दिसून आले होते. अजुनही वन्य जीवींचा वावर सुरूच आहे जिल्ह्यात बिबट्या, हरिण, तरस झाल्यावर आता हत्तींचा वावर वाढला आहे. खानापूर तालुल्यातील काडूगाई या गावाजवळील रस्त्यावर मंगळवारी हत्तीचे दर्शन झाले आहे
जंगली प्राण्यांचा वावर वाढणे ही बाब चिंताजनक असून वनखात्याकडून अजूनही बिबट्याला पकडण्यात यश आलेले नाही. बिबट्याची दहशत असतानाच आता खानापूर तालुक्यात हत्तीचे दर्शन झाल्याने वनखाते चांगलेच चक्रावले आहेत.
शिवाय या प्रकाराबद्दल वनमंत्र्यांकडून देखील कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. . बेळगाव जिल्ह्यात दाखल होत असलेले विविध प्राणी आणि यामुळे वाढलेली धास्ती हा चर्चेचा विषय बनला आहे . यामुळे वनविभाग याबद्दल आता काय करणार असा सवाल उपस्थित होत आहे.
खानापूर तालुका प्रामुख्याने घनदाट जंगलांनी व्यापलेला आहे यामुळे या भागात विविध प्राणी असणे साहजिकच आहे मात्र आता जंगलात राहणाऱ्या या प्राण्यांनी मानवी वस्तीत मोर्चा वळविला असल्यामुळे नागरिकांमध्ये घबराहट निर्माण झाली आहे.खानापूर तालुल्यातील काडूगाई या गावाजवळील रस्त्यावर मंगळवारी हत्तीचे दर्शन झाले आहे सगळे हत्तीचे फोटो सोशल मीडियावर व्हॉयरल देखील झाले आहेत
या तालुक्यात हत्तीसह अन्य जंगली प्राण्यांचा वावर सामान्य आहे. अशाप्रकारे जर विविध प्राणी मानवी वस्तीत आगमन करत असतील तर वनविभागाची जबाबदारी वाढली आहे.
सिमेंटच्या जंगलांनी प्राण्यांचा आसरा नाहीसा झाल्यामुळे अशा प्रकारे प्राणी मानवी वस्तीत दाखल होत असून परिणामी आता बिबट्या हरीण तरच हत्ती नंतर इतर प्राणी देखील मानवी वस्तीत येण्यास वेळ लागणार नसल्याच्या प्रतिक्रिया व्यक्त होत आहेत.