आयुष्य खूप सुंदर आहे, मात्र राईड करता आली पाहिजे या वाक्याचे नवल वाटते ना मात्र बेळगाव मध्ये फिरताना आयुष्य खूप सुंदर आहे मात्र राईड करता आली पाहिजे हे स्वप्नवत आहे. कारण खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे असा प्रश्न बेळगावात फिरताना पडतो. या गंभीर समस्येकडे लक्ष वेधण्यासाठीच रोहन कल्याणपुरकर या युवकाने आयुष्य खूप सुंदर आहे मात्र राईड करता आली पाहिजे अशा आशयाचे एक व्हिडिओ इंस्टाग्राम वर अपलोड केला आहे.
येथील रस्त्यांची परिस्थिती अधिक बिकट असून ही समस्या जीवावर देखील बेतू शकते.म्हणूनच शहरातील फोर्ट रोड, शनी मंदिर रोड, पोस्ट ऑफिस रोड आणि कॅम्प रोड या भागातील रस्ता कसा खड्डेमय आहे हे सदर व्हिडिओमध्ये दाखविन्यात आले आहे.
फुलबाग अल्ली येथील रोहन कल्याणपुरकर या सॉफ्टवेअर इंजिनियर असणाऱ्या युवकाने सदर परिस्थिती गंभीर असून यावर उपाय म्हणून आपला मित्र स्वप्नील पाटील यांच्या समवेत हा व्हिडिओ बनवला आहे. 8 ऑगस्ट रोजी सदर व्हिडिओ तयार करण्यात आला असून स्वप्नील पाटील यांनी बाईक चालवली आहे तर रोहन कल्याणपुरकर यांनी सदर व्हिडिओचे चित्रीकरण केले आहे.
इंस्टाग्रामवर सदर व्हिडिओ अपलोड करताच सदर व्हिडिओला लाईक आणि शेअर मिळाले असून या गंभीरतिकडे प्रशासनाने लक्ष देऊन उपाययोजना करावी यासाठी सदर व्हिडिओ बनविण्यात आला आहे.
30 सेकंदाच्या या व्हिडिओमध्ये अगदी मार्मिकपणे रस्त्यातील खड्डे आणि विना हेल्मेट वाहन चालविताना घेण्यात येणारा दंड याबाबत सामान्य नागरिकाच्या असणाऱ्या भावना व्यक्त करण्यात आल्या आहेत.
बेळगावातील खड्ड्यांची अशीही जनजागृती#PathholesBelgaum #Viralvdo pic.twitter.com/eKw75kniZd
— Belgaumlive (@belgaumlive) August 12, 2022