बेळगावच्या दोघा पोलीस अधिकाऱ्यांसह राज्यातील सात अधिकाऱ्यांना आयपीएस अधिकारी पदी बढदी देण्यात येणार आहे.केंद्र सरकारच्या गॅजेट मध्ये अशी अधिसूचना निघाली आहे.
सचिन घोरपडे, संजीत व्ही जे, राम लक्ष्मणसा अरसिध्दि,गोपाल एम ब्याकुड, बाबासाब नेमगौडा, या पाच आणि बेळगाव जिल्ह्याचे अतिरिक्त पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी आणि शहराचे तत्कालीन पोलीस उपायुक्त विक्रम आमटे याना आयपीएस पदी बढती मिळणार आहे.
या अगोदर हे सर्व अधिकारी के एस पी एस होते आता ते आय पी एस असणार आहेत.
राज्यातील विविध ठिकाणी खाली असलेल्या आय पी एस पदाची रिक्त पदे भरली जाणार आहेत त्यात यांचा समावेश असणार आहे. केंद्रीय गृह खात्याचे अधीन कार्यदर्शी संजीवकुमार यांनी १२ आगस्ट रोजी असा आदेश बजावला आहे.
विक्रम आमटे सध्या शिमोगा पोलिसात डी सी पी म्हणून कार्यरत आहेत तर महानिंग नंदगावी हे बेळगाव जिल्ह्याचे ऍडिशनल एस पी आहेत.
विक्रम आमटे यांचे मूळ गाव सौन्दत्ती तालुक्यातील मुनवळ्ळी गावचे रहिवाशी तर महानिंग नंदगावी हे हुक्केरी तालुक्यातील जंगटीहाळ गावचे रहिवाशी आहेत.